लोकशाहीर अन्नाभाऊ साठे जयंतीच्या निमित्ताने मणिपुर अमानविय घटनेचा निषेध
राष्ट्रपती ला निवेदनातून आरोपींना फाशी देण्याची मागणी
कन्हान,ता.०१ ऑगस्ट
देशातील मणिपुर राज्यात मागील तीन ते चार महिन्यापासुन हिंसा सुरु आहे. दरम्यान दोन स्रियांना निर्वस्त्र करुन धिंड काढत त्यांच्या देहाची विटंबना करून सामुदायिक बलात्कार केला गेला. केंद्र आणि राज्य सरकारने आता पर्यंत परिस्थिती वर नियंत्रण न मिळवल्याने हिंचारात १४० पेक्षा जास्त लोकांचा मृत्यु झाला तर ३०० पेक्षा जास्त लोक जख्मी झाले आहे. मणिपुर येथे घडलेल्या घटनेने संपुर्ण देश हादरला असुन प्रत्येक महिला आणि नागरिकांच्या भावना दुखविल्या आहे.
याच पार्श्वभुमीवर मंगळवार (दि.१) ऑगस्ट ला साहित्यरत्न, लोकशाहीर अन्नाभाऊ साठे यांच्या १०३ व्या जयंतीचे औचित्य साधुन कन्हान नगरातील सामाजिक जनतेच्या आणि संपुर्ण सामाजिक संघटनेच्या वतीने मणिपुर येथे झालेल्या अमानविय क्रुर कृत्य घटनेच्या विरोधात जाहिर निषेध कार्यक्रम थाटात पार पडला.
सर्व प्रथम संताजी नगर कांद्री येथे अन्नाभाऊ साठे यांच्या प्रतिमे ला कन्हान शहर विकास मंच संस्थापक अध्यक्ष ऋृषभ बावनकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करित अभिवादन करुन कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. यावेळी प्रामुख्याने शहर विकास मंच मार्गदर्शक प्रभाकर रुंघे, प्रभाकर बावने, सौ.सिंधुताई वाघमारे, राखी परते यांनी अन्नाभाऊ साठे यांचा जीवन चिरित्र्यावर उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यानंतर डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक कन्हान येथे सौ. सुनिता मानकर यांचा हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण व अभिवादन करित केंद्र सरकार आणि मणिपुर सरकार च्या विरोधात जोरदार निर्दशने करुन हिंचारात मृत्यु झालेल्या निष्पाप लोकांना दोन मिनटा चा मौनधारण करुन भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
आदिवासी गोवारी समाज संघटना अध्यक्ष आनंद सहारे यांचा नेतृत्वात कन्हान पोलीस निरिक्षक प्रमोद मकेश्वर यांच्या मार्फत महामहिम राष्ट्रपती सौ. द्रौपदी मुर्मु यांना निवेदन पाठवुन मणिपुर राज्य सरकार बर्खास्त करुन राष्ट्रपती शासन लागु करुन महिले शी अमानविय क्रुर कृत्य करणाऱ्या आरोपींना फाशी ची शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली. प्रसंगी सौ.रीता बर्वे, सुषमा खोब्रागडे, मनिषा कोरवते, लता रोखडे, प्रमिला वैकार, प्रमिला रंगारी, सुनिता कोतप ल्लीवार, कुंदा रंगारी, लोकेश बावनकर, शांताराम जळते, सुरज वरखडे, समीर मेश्राम, संदीप परते,शंकर इवनाते, नितिन मेश्राम, रामलाल पट्टा, राहुल टेकाम, सतिष भसारकर, महेश बावनकुळे, कल्लु नायक, रामेश्वर पाल, पुंडलिक नागपुरे, नरेंद्र खडसे, सुरेश आंबिलडुके, विरेंद्र खडसे, पंचम सलामे, घनश्याम ऊके, स्वप्निल मानकर, दिपचंद शेंडे, राजन मनघटे, प्रमोद वाघमारे, सावन लोंढे, राजेश टेकाम, भुरा पात्रे, महेश खडसे, सावंत लोंढे सह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Post Views: 767