मागील वर्षाची दिव्यांग निधि त्वरित वाटप करावी
कन्हान,ता.०१ ऑगस्ट
नगरपरिषद कन्हान-पिपरी व्दारे सन २०२२ – २३ या वर्षांची दिव्यांग ५% निधि आता पर्यंत दिव्यांगाना देण्यात आली नसल्याने ही दिव्यांगाची निधि त्वरित वाटप करण्यात यावी अशी मागणी नगर सेवक विनय यादव यांनी कार्यालय अधिक्षक जगताप मार्फत मुख्याधिका-यांना निवेदनातून देऊन केली असुन वाटप न झाल्यास उपोषण करण्याचा इशारा दिला.
शासनाच्या आदेशानुसार नगरपरिषद कन्हान कार्यालय व्दारे दिव्यांग ५ % निधी वाटप करणे गरजेचे होते. परंतु आपण सन २०२२-२०२३ या वर्षाची निधी अजुनही दिव्यांगाना वाटप करण्यात आलेली नाही. यावरून शासनाच्या आदेशाची नगरपरिषद पायमल्ली करित आहे असे दिसुन येत आहे. करिता मंगळवार (दि.१) ऑगस्ट ला नगरसेवक विनय यादव यांनी नगरपरिषद कार्यालय अधिक्षक जगताप यांचे मार्फत मुख्याधिकारी कन्हान यांना निवेदन विनंती करण्यात आली. याप्रसंगी नगरपरिषद अभियंता नामदेव माने, स्वच्छता विभाग प्रमुख फिरोज बिसेन प्रामुख्याने उपस्थित होते. नगरपरिषदेने दिव्यांग बांधवाची ५% निधी त्यांना त्वरित वाटप करण्यात यावी. दिव्यांग निधी तात्काळ वाटप न झाल्यास नगरपरिषद कार्यालय सामोर लोकशाही मार्गाने उपोषण करण्यात येईल असा इशारा सुध्दा देण्यात आला आहे. यावेळी नगरसेवक विनय यादव, दिपचंद शेंडे, अखिलेश मेश्राम, नितीन मेश्रान आदि उपस्थित होते.
Post Views: 640
Tue Aug 1 , 2023
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन कन्हान,ता.०१ ऑगस्ट भारतीय जनता पार्टी कन्हान शहर तर्फे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती भारतीय जनता पार्टी कार्यालय कन्हान येथे साजरी करण्यात आली. प्रस्तुत कार्यक्रमाचे अध्यक्ष भाजपा शहर […]