बातमी चा परिणाम
बोगस धान बियाण्याने प्रकरणाची चौकशी झाली सुरू:संजय सत्येकार
कन्हान ता. 1ऑक्टोबर : शेतकऱ्याच्या तक्रारीचा व संजय सत्येकार यांचा पुढाकाराने बोगस धान बियाच्या चौकशी साठी कृषी विद्यापीठाचे तज्ञ व अधिकारी पोहचले शेतात.
नागपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात हैदराबाद येथील पातुरु बीज कंपनीचे मनाली 777 या वाणाचे भेसळ बीज लागवड झाल्यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक झाली आहे.हे भेसळ बियानाचे प्रकरण संजय सत्येकार यांनी समोर आणले.या बोगस धान बिजामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होणार आहे. प्राथमिक चौकशीत कृषि विद्यापीठ अधिकारी तज्ञाचा मते पातुरु कंपनीच्या बियांनमध्ये मोठ्या प्रमाणात भेसळ असल्याचे मान्य केले आहे.
यावेळी रामटेक उपविभागीय कृषी अधिकारी मिसाळ, पारशिवानी तालूका कृषी अधिकारी गेचे मैडम,मौदा तालुक्याचे अधिकारी व कृषी विद्यापीठाचे नवलाखे,मानकर व इतर अधिकारी चौकशी प्रसंगी हजर होते.