टॅकटर टाॅली उलटलयाने १४ कामगार ग॔भिर जखमी.
(महिलांसह लहान मुली मुले गंभीर जखमी .
आठ गंभीर जखमी रुग्णांना नागपुर येथील शासकीय रुग्णालयात केले रेफर.
नयाकुड पेच नदी जवळ सायंकाळी धडली धटना.)
पारशिवनी ÷ आमडी फाटा मार्ग सावनेर कडे टॅकटर टाॅलीत बसुन जात असलेल्या मंजुराचया टॅकटर टाॅलीला अपघात होउन १४ मंजुर गंभीर जखमी झाल्याची धटना शनिवारी सायंकाळी पाच वाजताच दरम्यान पेच नदी नयाकुड रस्त्यावर धडली.त्यात आठ मंजुराना गंभिर दुखापत झाल्याने नागपुर येथील शासकीय इस्पितळात उपचाराकरीता पाठवण्यात आले.
मिळालेल्या माहीती नुसार मौदयावरुन टॅकटर एम. एच. २६.बी. एल. ३५६७ च्या चालक एकामागोमाग दोन टाॅलया टॅकटर ला जोडून त्यात मंजुराना धेउन आमडी फाटा मागॅ पारशिवनी कडे येत असता नयाकुड नदिजवळील रस्त्यावर निषकाळजी पणाने टॅकटर चे ब्रेक दाबलयाने मागील टाॅली ही मंजुर बसलेल्या टाॅलीवर आदळुन उलटलयाने त्यातील लहान मोठे मुले मुली महीला या टाॅलीखाली आल्याने गंभिर जखमी झाले. ही घटना शनिवारी सायंकाळी पाच वाजता च्या दरम्यान धडली. घटनेची माहीती मिळताच पारशिवनी पोलीस घटना स्थळावर पोहचुन जखमीना पारशिवनी येथील ग्रामीण इस्पितळात दाखल केले.
त्यात सुकालीसिंग ढेबरे वय 30, रोषनी धुमकेती वय 20, रोषनी रामपाल ढेबरे वय 20 उमिला मडावी वय ४० , पवनकुलसिग ढोबरे ४०, जानकी हरिष यादव २१, पुजा पायसिंग यादव २५ सर्व रा बडझर जिल्हा डिडोरी मध्य प्रदेश येथील राहणारे असुन. सौ. संजना दुगॅश खुषराम वय २२डिडोरी मध्य प्रदेश, कु. नव्या हरिसिंग यादव. वय ३ वषॅ , जय हरिसिंग यादव वय २ वषॅ , उमिंला सेहनु मरावी वय ३५ , पनकु सुदरलाल टेबरे वय ४० व इतर उवॅरीत जखमीना पारशिवनी येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर समाज सेवक संजय व्यास, रमेश मोहड, आशिफ शेख, यानी जखमीना इस्पितळात उपचाराकरीता मदत केली. घटनेचा पुढील तपास पारशिवनी पोलीस करीत आहे