*कन्हान येथे एंटीबॉडी टेस्टींग व प्लाज्मा शिविर थाटात संपन्न*
कन्हान :- देशातील कोरोना ची परिस्थिती पाहता रुग्णालयात रुग्णांना होणारी कमतरता भासत असल्याने हमारी दुनिया संघटन , युवा चेतना मंच व कन्हान शहर विकास मंच यांचा संयुक्त विद्यमानाने दोन दिवसीय एंटीबॉडी टेस्ट , प्लाज्मा शिविर व राक्तदान शिविराचे आयोजन डोणेकर सभागृह येथे करुन नागरिकांना कोव्हिड 19 विषयी जनजागृती करित थाटात संपन्न करण्यात आले .
देशात , राज्यात , नागपुर जिल्ह्यात सह कन्हान परिसरात कोरोना ची परिस्थिति अत्यंत भयावह झाल्याने व रुग्णालयात कमरता भासत असल्याने सामाजिक बांधिलकीतुन समाजात कोव्हिड 19 विषयी जनजागृती करण्यास हमारी दुनिया संघटन , युवा चेतना मंच , व कन्हान शहर विकास मंच यांच्या संयुक्त विद्यमाने कन्हान येथे डोणेकर सभागृहात मंगळवार दिनांक २७ व बुधवार दिनांक २८ एप्रिल ला दोन दिवसीय एंटीबॉडी टेस्ट , प्लाज्मा शिविर व रक्तदान शिविर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असुन शिविरात ६५ नागरिकांनी एंटीबॉडी टेस्ट केली असुन ३५ नागरिक प्लाज्मा देण्यासाठी पात्र असल्याचे आढळले असता मात्र ८ नागरिकांनी प्लाज्मा दान केले व ६ नागरिकांनी रक्तदान केले .
शिविर लाईफ लाईन ब्लड बैंक यांच्या सहकार्याने योग्य रित्याने पार पाडले .
कार्यक्रमाचे सुत्र संचालन ज्ञानेश्वर दारोडे , यांनी केले तर आभार शरद डोणेकर यांनी मानले .
कार्यक्रम यशस्विते करिता ज्ञानेश्वर दारोडे , विनोद कोहळे , प्रवीण गोडे , रुषभ बावनकर , निखिल तिडके , स्टेफन फ्रांसिस , सौरभ यादव सह आदि ने सहकार्य केले .