प्रतिबंधक उपाय व नियमाचे पालन करित बाप्पाला निरोप
महामारी संकटात श्रीगणेश विसर्जन शांतेत संपन्न
कन्हान ता.2 : श्री गणेश मुर्तीचे विसर्जन कन्हान नदीच्या काली माता मंदीर घाटावर दि. १ सप्टेंबर ला सायंकाळी ६ वाजेपर्यंत कडक पोलीस बंदोबस्त आणि नियमाचे पालन करण्याकरिता नगरपरिषदे मार्फत विसर्जन घाटावर कटघरे, विद्युत, स्वयंसेवक, कृतिम तलाव, माहीती व मदत कक्षासह व्यवस्थित व्यवस्था करण्यात आली होती.
कन्हान शहर व ग्रामिण परिरातील ३० गावा पैकी सार्वजनिक गणेश मंडळाने शहरात ४, ग्रामिण भागात १० असे १४ तर घरघुती ६२१ श्री गणेश मुर्ती स्थापना करून संपुर्ण मानवाच्या कल्याणार्थ कोविड-१९ ( कोरोना विषाणु ) महामारी चे संकंट हद्दपार करण्याकरीता श्री गणेशा ला साकडे घालुन भाविक मंडळी शासनाच्या नियमाचे पालन करीत शांतेत गर्दी न करता १० दिवस मनोभावे पुजा अर्चना करून श्री गणेश मुर्तीचे विसर्जन करण्यात आले .
या वर्षी पेंच व तोतलाडोह धरणे भरून असल्याने मध्यप्रदेशात होणा-या पाऊसाने दोन्ही धरणाचे दरवाजे उघडुन धरणातील पाण्याचा विसर्ग नदीत होत असल्याने कन्हान नदीपात्रात पुरपरिस्थीती लक्षात घेता .पोलीस उपविभागीय अधिकारी संजय पुजलवार व ठाणेदार अरूण त्रिपाटी यांनी काली मंदीरा जवळ कडोकड पोलीस बंदोबस्त तैनात करून व मुर्तीचे सुखरूप विसर्जन करण्या करीता ढिवर समाज सेवा संघटनांचे प्राचारण करून त्याचा सामाजिक चळवळीत सेवा भावी करणार्या समाज बांधवांना पोलीस विभागा तर्फे टी शर्ट व भेट वस्तु देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी गणेश विसर्जन स्थळी शांतपणे यशस्वी करण्यासाठी ग्रामीण पोलीस अधिक्षक राकेश ओला तसेच कन्हान न.प.अध्यक्ष सौ.करूणाताई आष्टनगर व न.प.नगरसेवक व नगरसेविका, नं.प. कर्मचारी व पोलीस कर्मचारी सुध्दा उपस्थित होते.
दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील कोळी समाज सेवा संघटना कन्हान चे पदाधिकारी सुतेश मारबते, बालचंद्र बोंदरे, मनोज मेश्राम, श्रीकांत मानकर, नरेश मेश्राम, रितेश मोहने, सौ. रेखा ताई भोयर, सौ. कुंदाताई कांबळे, कार्यकर्ते सचिन खंडाते,राजु मारबते, मोहन वैयले, हेमराज मेश्राम, सुधाकर सहारे, रामचंद्र भोयर, विनोद गोंडाळे, राजु मेश्राम, धर्मराज खंडाते, प्रमोद गोंडाळे यांचे सहकार्य लाभले.