कृषी खतात भेसळ प्रकरणी गोडाऊन सिल करून सखोल तपास सुरू
#) जि प अध्यक्षा व कृषी अधिका-यांची कार्यवाही.
कन्हान : – नागपुर जिल्हा परिषद अध्यक्षा यांच्या उपस्थितीत कन्हान येथील नाका नंबर सात च्या कृषी खाद्य गोडाऊन मध्ये अचानक धाड टाकली असता कृषी खताच्या बो-या संशयास्पद आढल्याने रात्र झाल्याने कन्हान चे गोडाऊन सिल करून वराडा येथील मोठे गोडाऊन सिल करण्याकरिता कृषी अधिकारी, पोलीस व कॉग्रेस कार्यकर्ते रवाना झाले असुन ही कार्यवाही दोन तीन दिवस चालुन सखोल तपास करण्यात येणार आहे.
कन्हान येथील कृषी खताच्या गोडाउन मध्ये कृषी खताच्या बोर्यात भेसळ होत असल्याची सुचना जिल्हा परिषद अध्यक्षा श्रीमती रश्मी बर्वे यांना मिळाली होती. आज गुरूवार (दि.१) ला आपल्या अधिकाऱ्यासह सायंकाळी सातच्या सुमारास अचानक भेट दिली. गोडाऊन ला कुलूप लावले होते. अपरिहार्य कारणास्त व तातडीने कुलूप तोडण्यात आले. आत असलेल्या कृषी खताची पाहणीत अनेक त्रुटया दिसुन आल्या व गोडाउन मध्ये मोठ्या प्रमाणात खतांच्या बो-यात जुन्या बो-याचे खत नविन बो-यात उघडया दिसुन आल्या. याबाबत गोडाऊन संचालक समाधान कारक उत्तर देत नसल्याने जिल्हा कृषी अधिकारी श्री पंकज लोखंडे, मोहीम अधिकारी नागलगोजे हयांनी काही सहका-यांना वराडा येथील गोडाऊन मध्ये पाठवुन रात्र झाल्याने कन्हान येथील गोडाऊन सिल करून वराडा च्या मोठा गोडाऊन कडे प्रस्थान केले.जिल्हा कृषी अधिकारी यांना विचारले असता या सखोल चौकशीला दोन-तीन दिवस लागतील असे सांगितले. यावेळी कन्हान पोलीस स्टेशनचे एपीआय अमित कुमार आत्राम, शरद गिते, काँग्रेसचे उदयसिंग (गजु) यादव, जिल्हा उपाध्यक्ष नरेश बर्वे, कांद्री ग्रा पं उपसरपंच श्यामकुमार बर्वे, कन्हान नगरपरिषदेचे उपाध्यक्ष योगेंद्र रंगारी, नगरसेवक मनिष भिवगडे, नगर सेविका रेखा टोहने आदी सह अनेक काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.