कोळसा खदन येथे पकडला १२ – १३ फुटाचा अजगर
#) सर्प मित्रांनी जंगलात सोडुन दिले जिवदान.
कन्हान : – शहरा पासुन ३ किमी अंतरावर असलेल्या कोळसा खदान नंबर ६ टेकाडी येथे श्रीराम खरवाल यांच्या शेतात अजगर प्रजातीचा साप दिसल्याने परि सरात चांगलीच खळबळ उडाल्याने खदान नंबर ६ चे ग्रा पं सदस्य साकिर सिद्दीकी ने टेकाडी च्या सर्पमित्रा ना बोलावुन अजगर ला पकडुन त्यांनी जंगलात नेऊन सोडुन सापाला जिवनदान दिले.
शुक्रवार (दि.१) ऑक्टोंबर २०२१ ला सकाळच्या सुमारास कोळसा खदान नंबर ६ टेकाडी येथे श्रीराम खरवाल यांच्या शेतात १२-१३ फुट अजगर प्रजातीचा साप दिसल्याने शेत मालक श्रीराम खरवाल यांनी ही माहिती कोळसा खदान नंबर ६ चे ग्रा पं सदस्य साकिर सिद्दीकी यांना दिली असता त्यांनी टेकाडी रहिवासी सर्प मित्र वैभव मेश्राम, कैलास मनगटे यांना फोन करू न माहिती दिली असता ते जास्त वेळ न लावता तात्का ळ श्रीराम खरवाल यांच्या शेतात पोहचुन त्यांनी अजग र प्रजातीच्या सापाला व्यवस्थित पकडुन त्यानी मनसर – माहुली च्या जंगलात नेऊन सोडुन अजगर सापाला जिवनदान दिले. याप्रसंगी महेंद्र भुरे, शाकिर सिद्दीकी, शकिल सिद्दीकी, कृष्णा इंगोले, धर्मेंद्र गोसाई, रामप्रका श शर्मा सह उपस्थित नागरिकांनी सहकार्य केले.