“माहेर” महिला मेळाव्याला उत्सपुर्त प्रतिसाद
कन्हान,ता.01 ऑक्टोबर
माहेर महिला मंच द्वारे भव्य महिला मेळावा शनिवार (ता.01) ला कुलदीप मंगल कार्यालय, कन्हान येथे आयोजित करण्यात आले होते.
देशाच्या प्रगतीच्या वाटेवर महिलांचे राजकीय, सामजिक, शैक्षणिक व सांस्कतिक क्षेत्रात उत्तम योगदान व त्यांच्या या कार्यास नमन म्हणून सावित्री बाई फुले व दुर्गा देवी यांच्या प्रतिमेला माल्यार्पण, पूजन व दीप प्रज्वलीत करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आले. माहेर महिला मंचचे आयोजन अध्यक्षा सौ.रीता ताई बर्वे व उपाध्यक्षा सौ. सुनिता ताई मानकर यांनी केली. नवरात्रोत्सव निमित्त आरोग्य विभागा द्वारे राबविण्यात आलेली “माता सुरक्षित तर घर सुरक्षित” या शिबिरा बद्दलची माहिती सर्व माता-भगिनींना या मंचाच्या माध्यमातून देण्यात आले. व्यास पिठाला लाभलेली पाहुणे व कार्यक्रमाचे उद्घाटक सौ.रश्मी ताई बर्वे अध्यक्षा नागपूर जिल्हा परिषद, एस.क्यू. जमा माजी आमदार, नरेशजी बर्वे अध्यक्ष राष्ट्रीय कोयला मजदुर संघ तथा उपाध्यक्ष नागपुर जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटी, सौ.तक्षशिला ताई वाघधरे महासचिव महा.प्रदेश काँग्रेस कमिटी, कू.कुंदा ताई राऊत अध्यक्षा नागपूर जिल्हा ग्रामीण महिला काँग्रेस कमिटी, सौ.गुंफाताई तिडके नगरसेविका न.प.कन्हान, कू.रेखा ताई टोहने नगरसेविका न प. कन्हान, पुष्पा कावडकर नगरसेविका न.प.कन्हान, सौ.मिना ताई ठाकूर आदी मान्यवरांचा उपस्थितीत कार्यक्रम पार पडला.
शुभ प्रसंगी मीना वाटकर, सविता बावणे, वनिता मसार, छाया रंग, पुष्पा बावणे, सरोज राऊत, प्रतिभा बावनकुळे, रंजीता सूर्यवंशी, कल्पना बागडे, सुमन भिवगडे, प्रतिभा घारपींडे, वंदना बागडे, पूनम माहुल, मीना पुणेकर, माया वाघमारे, पुष्पा खंगारे, अश्विनी जैन, सोनाली मसार, कल्पना शिरपूरकर, कुसुम वडे, सुनंदा कठाणे, राजकन्या यादव, मंदा बागडे आदी माता भगिनी आवर्जून उपस्थित होते.
कार्यक्रमा द्वारे महिलांन मध्ये नविन स्फुर्ती व आत्मविश्वास वाढला. सर्व महिलांनी या माहेर महिला मंच चे आभार मानले.
Post Views: 965
Sun Oct 2 , 2022
निलज सरपंचा, ग्रामसेवक, रोजगार सेवकावर फौजदारी गुन्हा दाखल करा- ग्रामस्थांची मागणी मनरेगा योजनेत अनियमिता व भ्रष्टाचार केल्याचा आरोप. कन्हान,ता.02 ऑक्टोबर निलज ग्राम पंचायत मध्ये सरपंचा आशा ताई पाहुणे यांनी आपल्या मुलास कार्यालयीन शिपाई व उपसरपंच पंकज टोहने यांनी भावास पाणी पुरवठा शिपाई पद्दी नियम बाहय नियुक्ती केली. ग्रामसेवकांने […]