नगर परिषद कन्हान येथे शांतता समितिची बैठक संपन्न
सण उत्सव शांततेत करण्याचे नगर परिषद व पोलीस प्रशासनाचे नागरिकांना आव्हान
कन्हान,ता.02 ऑक्टोबर
कन्हान नगर परिषद नवीन इमारत येथे बुधवार ला नवरात्र, दसरा, धम्मचक्र प्रवर्तन आणि इतर सण उत्सव निमित्य शांतता समिति च्या बैठकीचे आयोजन करण्यात आले. बैठकी मध्ये नप नगराध्यक्षा सौ. करूणाताई आष्टणकर व पोलीस निरीक्षक विलास काळे यांनी सण उत्सव शांततेत साजरे करण्याचे आव्हान नागरिकांना केले.
बुधवार (ता.२८) ला कन्हान नगर परिषद नवीन इमारत येथे नप नगराध्यक्षा सौ.करूणाताई आष्टणकर यांच्या अध्यक्षतेखाली व पोलीस निरीक्षक विलास काळे यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये नवरात्र, दसरा, धम्मचक्र प्रवर्तन आणि इतर सण उत्सव निमित्य शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकी ला दुर्गा समिति चे अध्यक्ष ,पदाधिकारी, गावातील सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील, सामाजिक कार्यकर्ते, महिला वर्ग प्रामुख्याने उपस्थित होते . या सण उत्सव दरम्यान कोणत्याही अफवांवर लक्ष देऊ नये. सुचना देण्यात आल्या दुर्गा समिति च्या मंडळ पदाधिकार्यांना मुर्ती प्रतिष्ठापना, वीज, स्वच्छता ,वाहतुक, साऊंड सिस्टीम अशा अनेक विषया वर मार्गदर्शन करण्यात आले. सण उत्सव वेळी शासनांच्या नियमांचे पालन करुन परिसरात शांतता राखावी. गरबा, आखाड्यत , आणि इतर कार्यक्रमात कोणी ही घातक शस्त्र बाळगु नये आणि सण उत्सव काळात कोणी दाऊ पिऊन नियमांचे उल्लंघन करतांना आढळल्यास कारवाई करण्यात येईल व सर्वांनी सण उत्सव शांततेत साजरे करण्याचे आव्हाहन नप नगराध्यक्षा सौ.करुणाताई आष्टणकर व कन्हान पोलीस निरीक्षक विलास काळे यांनी नागरिकांना केले आहे .या बैठकीला ढिवर समाज कन्हान अध्यक्ष सुतेश मारबते , कांद्री ग्रामपंचायत सरपंच बलवंत पडोळे, जेष्ठ नागरिक विनायक वाघधरे, खंडाळा घटाटे ग्रामपंचायत उपसरपंच चेतन कुंभलकर, हर्षल कुंभलकर, शुभम यादव, आकाश प्रसाद, वामन मेश्राम, वामन देशमुख , सुरेश काकडे , अरविंद गजभिए, संतोष ठाकरे, ईश्वर राऊत, वैशाली थोरात , वैशाली देबिया, अनिता पाटील, रेखा भोयर, कुंदा कांबळे, शुभांगी घोगले , सह आदि नागरिक आणि महिला मोठ्या संख्येत उपस्थित होते .
Post Views: 925