दिलीपसिंह बागडी यांचा सेवानिवृत्ती सत्कार
कन्हान : – जि.प.उच्च प्राथमिक शाळा निलज पं.स. पारशिवनी येथील सहायक शिक्षक दिलीपसिंह देवसिंह बागडी हे नियत वयोमानानुसार ३१ आक्टोंबर २०२० ला वयाची 58 वर्षे पूर्ण झाल्यामुळे जि.प. सेवेतून सेवानिवृत्त झाले. त्यानिमित्त त्यांचा सपत्नीक सेवानिवृत्ती सत्कार जि.प.प्राथमिक शाळा निलज येथे करण्यात आला.
या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी ग्रामपंचायत निलजचे सरपंच मा. पंकज टोहणे होते. प्रमुख अतिथी म्हणून जि.प. सदस्य मा. व्यंकटेश कारेमोरे, प्राथ. शि क्षक संघाचे नागपूर जिल्हा सरचिटणीस वामन पाहुणे, सेवानिवृत्त शिक्षक प्रकाश रंगारी, मुख्याध्यापक प्रमोद हरणे, विषयशिक्षक अनिल नागपुरे, सहायक शिक्षिका श्रीमती लता वंजारी, श्रीमती लता जळते, सौ. बागडी, चंदनकुमार बागडी व गावकरी नागरिक उपस्थित होते.
या प्रसंगी जि.प.सदस्य व्यंकटेश कारेमोरे यांनी मनोगतात बागडी सरांनी आपल्या सेवा काळात अनेक चां गले विद्यार्थी घडवले, गावातील लोकांशी सलोख्याचे संबंध निर्माण केले तसेच विद्यार्थ्यांच्या व शाळेच्या विकासासाठी अविरत प्रयत्न केले. असेच ईतर शिक्ष कांनी सुद्धा करावे व काही अडचण असल्यास माझ्या शी संपर्क करावा असे म्हटले आणि बागडी सरांच्या सेवानिवृत्ती नंतरच्या निरोगी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे संचालन अनिल नागपुरे यांनी तर आभार प्रदर्शन श्रीमती जळते यांनी केले.