सावित्रीबाई फुले जयंती विशेष लेख ….

*सावित्रीबाई फुले जयंती विशेष लेख ….*

*राजकारणातील प्रतिभा ………..*

आज सावित्रीबाई फुले जयंती आहे, सगळीकडे सावित्री बाई फुले यांचा सन्मान केला जातो, महाराष्ट्र शासनाने देखील हा दिवस शिक्षिका दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. पण आपल्याच समाजात आपल्याच अवतीभोवती अनेक सावित्री आणि ज्योतिबा फुले आहेत. ते आजच्या समाजासाठी आदर्श आहेत. यातील एक रूप म्हणजे आमदार प्रतिभा धानोरकर आणि खासदार बाळू धानोरकर यांचं आहे. ज्या प्रमाणे ज्योतिबा फुले यांनी सवित्रीना आधी बाराखडीचा अ गिरवायला शिकवलं, त्याप्रमाणे राजकारणाचा अ आमदार प्रतिभा धानोरकर यांना खासदार बाळू धानोरकर यांनी शिकवला आणि आज प्रतिभा ताई धानोरकर एक सक्षम, महिलांचे प्रश्न उचलून धरणाऱ्या वरोरा विधानसभेतील पहिल्या आमदार बनल्या आहेत.
अल्पावधित लाेकप्रिय ठरलेल्या वराेरा भद्रावती क्षेत्राच्या चंद्रपूर जिल्ह्यातिल एकमेव महिला आमदार सर्वांच्या ताईसाहेब प्रतिभाताई धानाेरकर ह्यांचा जन्म दिनांक 9 जानेवारी 1986 राेजी यवतमाळ जिल्ह्यातिल वणी तालूक्यातील परमडाेह ह्या गावी झाला. त्यांच्या माहेरच्या कुटुंबात कुठल्याही प्रकारची राजकिय पार्श्वभूमी नव्हती. वडिल सुरेशजी काकडे व आई गिताताई ह्यांच्या कुंटूबात झाला. परंतु लहान पासून त्यांना समाजसेवेची अवलं होती. लग्नानंतर योगा योगाने जोडीदार देखील तसाच मिळाला. राजकीय पाश्वभुमी असलेले खासदार सुरेश धानोरकर यांच्याशी त्यांच्या विवाह झाला. लहान पानापासून समाजात राहून काम करण्याची आवड व समाजातील शेवटच्या वर्गाकरिता काहीतरी करण्याची तळमळ त्यांच्यात नेहमी होती. पती सोबत नेहमी त्या सक्रिय राजकारणात सुरुवातीच्या काळात नसल्या तरी सामाजिक कार्यात त्या नेहमी पुढे राहत. धानोरकर दाम्पत्य नेहमी फुले दाम्पत्याच्या आदर्श ठेऊन नेहमी प्रतिभाताई ह्या बाळू भाऊ यांच्या सुख दुःखात सोबत राहतात. बाळू भाऊ खासदार झाल्यानंतर वरोरा विधानसभा निवडणुकीत योग्य उमेदवार नसल्यामुळे वरोरा – भद्रावती विधान सभेतील जनतेला न्याय देण्याकरिता प्रतिभाताई ला उमेदवारी दिली.
वराेरा भद्रावती क्षेत्र हे महिला करिता राखीव क्षेत्र नसले तरी लहानपनापासूच महत्वाकांशी असलेल्या प्रतिभाताई धानाेरकर ह्यांनी काँग्रेसकडे उमेदवारी मागितली व त्यांना पक्षाने उमेदवारी दिल्यामुळे अनेकांच्या भुवया ऊंचावल्या. त्यांची उमेदवारी ही काेनत्याही प्रकारचे घराणेशाहीचा प्रकार नसला तरी घराणेशाहीचा सुध्दा त्यांचेवर आराेप करण्यात आला. सुरवातीस त्यांना विराेध झाला व त्या एक महिला म्हणून सक्षम उमेदवार ठरणार नाही, असा अनेकांचा समज हाेता . परंतू उमेदवारी अर्ज भरण्याचे दिवशी कटारिया भवन मधिल नामांकन अर्ज सादर करण्याच्या दिवशीचे सभेत त्यांनी दिलेल्या भाषातील त्यांच्या वक्तृत्व शैलीचा परिचय व नियाेजनबंध्द प्रचारांनी त्यांनी अनेकांची मने जिंकली व त्या एक सक्षम उमेदवार ठरतील ही खात्री झाली, बाळू भाऊंची समर्थ साथ, त्यांचा मित्रपरिवार, व क्षेत्रातील जनतेचा त्यांना भरपूर पांठिंबा मिळाला. व त्यामुळेच त्यांचेसमाेर सर्व बलाढ्य उमेदवार असतांना सुध्दा त्या प्रचण्ड बहु मताने विजयी हाेवून चंद्रपूर जिल्ह्यातून एकमेव महिला आमदार ठरल्या.
त्यांच्या माहेर किंवा सासर ह्यांचे कडे राजकिय वारसा नसला तरी आपल्या कर्तृत्वाने जिल्हा शिवसेना प्रमुख ते आमदार झालेले कार्य कुशल पती मा. बाळासाहेब ह्यांचे साेबत केलेल्या कार्यामुळे मिळालेल्या राजकिय व सामाजिक कार्याच्या अनुभवा द्वारे
आमदार म्हनून निवडून येताच त्यांनी क्षेत्रातील जनतेशी सतत संपर्क व लाेकांच्या समस्याशी साेडवनूक करण्यास आरंभ केला. अल्प काळातच काेराेनाचे संपुर्ण देशांत संक्रमण सुरू झाल.तेव्हा त्या काळात त्यांनी काेराेनाचा आपल्या क्षेत्रात शिरकाव हाेनार नाही त्याचे प्रतिबंधेसाठी प्रयत्नशील व कार्यरत असल्यामुळेच काेराेनाचा शिरकाव ब-याच उशिरा आपल्या क्षेत्रात झाला. तेव्हा काेराेना संशयीताचा शाेध रुग्नांनवर उपचार ह्यावर जातीने लक्ष दिले. साेबतच लाँकडाऊन मुळे अनेकांना राेजगार नसल्यामुळे गावांत 5 रुपयांत जेवन देणारी 2 शिवभाेजन केन्द्र त्वरेने सुरू केली, शिवाय अनेक कुंटूबांना तयार अन्नाची पाकिटे व धान्य पुरविले.आपल्या क्षेत्रातील शेतकरी, शेतमजुर, महिला व सर्वसाधारण जनता ह्यांच्या समस्या व त्या निवारन्यासाठी विधान सभेत तथा संबधित खात्याचे मंत्री ह्यांच्याकडे प्रभावीपणे प्रश्न व निवेदन देवून अनेक समस्या सोडविण्याकरिता त्या नेहमी आग्रही असतात.
तृतीयपंथीयांना समाजात सन्मानाने जगता यावे, यासाठी त्यांना पोलीस विभागात व इतर विभागात दोन टक्के आरक्षण देऊन नोकरीत स्थान द्यावे, अशी मागणी आमदार प्रतिभा धानोरकर यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे केली आहे. प्रतिभा धानोरकर यांनी यंदाची दिवाळी पती खासदार बाळू धानोरकर यांच्यासोबत त्यांच्या घरी तृतीयपंथीयांसोबत साजरी केली होती. तेव्हाच तृतीयपंथीयांसाठी निवास, नोकरी यांसदर्भात काम करणार, असे आश्‍वासन त्यांनी दिले होते. दिवाळी संपताच लगेच त्या कामाला लागल्या आणि आज त्यांनी एक टप्पा पूर्ण केला. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना त्यांनी या मागणीचे निवेदन दिले. याचा पाठपुरावा करून त्या आरक्षण मिळवतीलच, अशा विश्‍वास तृतीयपंथीयांना आहे. कारण आंध्रप्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रात दिशा कायदा अमलात आणावा, यासाठी त्या आग्रही होत्या. सर्वप्रथम नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात त्यांनीच ही मागणी केली होती. त्याचा सातत्याने पाठपुरावा केला होता आणि आज ‘दिशा’च्या धर्तीवर महिलांसाठी शक्ती हा कायदा आकार घेतो आहे. मतदार संघातील महिलांना स्वतःच्या पायावर उभं राहण्याकरिता त्या नेहमी आग्रही असतात. बचत गटातील महिलांना त्यांच्या माल विकणासाठी स्वतंत्र हक्काची बाजारपेठ उभी राहण्याकरिता बचत गटाचे मोल उभं करण्याची संकल्पा त्यांची आहे. त्या दृटीने त्या पाठपुरावा करीत आहेत. या महिलांच्या कामाची दखल घेत महाराष्ट्र काँग्रेस कमिटीने महिला प्रदेश उपाध्यक्ष पदावर त्यांची नियुक्ती केली आहे. सर्वप्रथम विधानसभेत महिलांकरीत कायदा हा कठोर करण्यासाठी विधानसभेत त्यांचीच विषय उपस्थित केला. हि महिलांनवरची तळमळ बगुन त्यांची मा. सभापती नाना पाटोले व काँग्रेस प्रदेश अध्यक्ष यांनी त्यांची या समितीवर सदस्य म्हणून महिला बाल अधिकार समितीवर त्यांची नियुक्ती केली. त्यासोबतच त्यांना ग्रामीण भागातील समस्यांची जाणीव असल्यामुळे त्यांची पंचायत राज समितीवर नियुक्ती देखील करण्यात आली आहे.

अल्पावधीत त्यांनी जे हे यश मिळवलं आहे ते नक्कीच कौतुकास्पद आहे, त्यांचा यशाचा आलेख असाच उंचवावा आणि त्या महाराष्ट्राच्या मंत्री मंडळात दिसाव्या ही सदिच्छा आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

कान्द्री येथे सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी

Sun Jan 3 , 2021
कान्द्री येथे सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी कन्हान ता.3 स्थानीय कान्द्री कन्हान येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा जयंतीनिमित्त आदरांजली वाहण्यात आली तरी या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थितीत गजानन हटवार सामाजिक कार्यकर्ते यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर प्रकाश टाकला तरी प्रमुख उपस्थितीत म्हणून प्रकाश वरकडे,गणेश सरोदे, हेमराज मस्के,अंकुश कुंभलकर,प्रामुख्याने उपस्थित होते कार्यक्रमाचे […]

You May Like

Breaking News

Archives

Categories

Meta