कन्हान येथे सावित्रीबाई फुले यांचा बालिका दिन म्हणून साजरा
कन्हान 3 जानेवारी
कन्हान येथील भीमशक्ती कार्यालयात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाउपाध्यक्ष चंद्रशेखर भीमटे यांचे हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या फोटोला हारार्पण करून बालिका दिन म्हणून जयंती साजरी करण्यात आली.
आपला समाज जाती,धर्म व पंथाने विखुरलेला आहे. तरीही त्यावेळेस कुठलीही तमा न बाळगता शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रात चळवळ गतीमान करून समाजात शेयेक्षणिक क्रांती घडवून आणली. याचेच उत्तम उदाहरण म्हणजे आपला इतिहास अजरामर करणाऱ्या सावित्रीबाई फुले होय. फुले दाम्पत्यानी शिक्षनाचे महत्त्व ओळखून समाजात ज्ञानाची दारे उघडली.शिक्षणाच्या बाबतीत जागृती केली. सर्व बंधनातून स्त्रियांची सुटका करणारी ज्योतिबांची सावित्रीबाई खरोखर रणरागिणी, युगस्त्री,तेजस्विनी,, नारीरत्न,क्रांतीज्योती होती. म्हणूनच त्यांच्या कार्याचा ठसा बालमनापासून मनावर बसावा, त्यांच्या कार्याची प्रेरणा घेऊन मुलींनी आपला सर्वांगीण विकास करून घ्यावा. त्यांच्या कार्याचा नंदादीप सदैव तेवत रहावा म्हणून सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिन 3 जानेवारी हा दिवस ‘बालिका दिन’ म्हणून साजरा केला जातो.
ज्या काळात स्त्रियांना चार भिंतीच्या आत कोंडवाड्याप्रमाणे डांबून टाकलेल्या अवस्थेत, कोंडलेली हवा आणि विचारही कोंडलेले अशा परिस्थितीत स्त्रीचा श्वास गुदमरलेला असे. तिचा विकास करण्यासाठी स्वछ व शुद्ध हवा शिक्षणाचा श्वास देणारा मांडणाऱ्या स्त्रीचा साक्षात्कार झाला. तो साक्षात्कार म्हणजे सावित्रीबाई फुले होय.
याप्रसंगी सावित्रीबाई फुले यांच्या जीवन कार्यावर रॉकाचे जिल्हाउपाध्यक्ष चंद्रशेखर भीमटे यांनी प्रकाश टाकला. यावेळी अमित कुमार आत्राम सहायक पोलिस निरीक्षक पत्रकार संघ चे अध्यक्ष रमेश गोडघाटे सलिम सिद्दीकी निखिल रामटेके निलेश पाटिल मनोज शेंडे,रजाक कुरेशी आर्यन भिमटे अंबादास खंडारे,मोरेश्वर खडसे,अशोक पाटील,नरेश सोनेकर,कुणाल लोंढे,शरद बेलेकर, भिमराव उके,देविदास खडसे,रामु खडसे,देवेंद्र खडसे,उइत्यादीसह असंख्य कार्यकर्त्यांची प्रमुख उपस्थिती कार्यक्रम संपन्न झाला..