कन्हान नगरपरिषद येथील क लिपीक रवि वासे यांच्या सेवानिवृत्तीपर सत्कार

कन्हान नगरपरिषद येथील क लिपीक रवि वासे यांच्या सेवानिवृत्तीपर सत्कार

कन्हान : – नगरपरिषद येथील नगर रचना विभागातील कनिष्ठ लिपिक श्री रवि वासे हे सेवानिवृत्त झाल्याने नप अधिका-यानी, नगसेविकांनी व कर्मचाऱ्यांनी रवि वासे यांचे सेवानिवृत्तीपर त्याना पुष्पगुच्छ व शाल श्रीफळ देऊन सत्कार करित पुढील वाटचाली करिता शुभेच्छा दिल्या.


कन्हान ग्राम पंचायतचे रूपांतरण नगरपरिषद मध्ये होऊन जवळपास सात वर्षे पुर्ण झाली असुन या नगरपरिषद मध्ये श्री रवी वासे हे नगर रचना विभागा तील कनिष्ठ लिपिक चा पदभार साभांळत होते. सोमवार (दि.३१) जानेवारी २०२२ रोजी कन्हान-पिपरी नगरपरिषद कार्यालय येथील नगर रचना विभागातील कनिष्ठ लिपिक श्री रवी वासे यांचे ५८ वर्ष वय पुर्ण झाल्यामुळे ते सेवेतुन सेवानिवृत्त झाल्याने कन्हान- पिपरी नगरपरिषद कार्यालय अधिक्षक श्री सुशांत नरहरे यांचे सह अधिका-यानी, नगरसेवक, नगरसेवि कांनी व कर्मचा-यानी श्री रवि वासे यांना शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला व पुढील वाटचाली करिता शुभेच्छा दिल्या. तसेच स्थापत्य अभियंता श्री नामदेव माने यांनी आपले मनोगत व्यक्त करित रवी वासे यांना शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी कन्हान- पिपरी नगरपरिषद येथील लेखपाल पंकज खडसे, संगणक अभियंता प्रिया शिरसाट, कनिष्ठ लिपिक देवीलाल ठाकुर, निरंजन बढेल, वसंत ब्राम्हणकर, राजेश राणा, नेहाल बढेल, भिमराव मेश्राम, अनिता यादव, रविंद्र पाहुणे नगरपरिषद उपाध्यक्ष डायनल शेंडे , नगरसेवक राजेंद्र शेंदरे, राजेश यादव, अनिल ठाकरे, नगरसेविका मोनिका पौनिकर, संगीता खोब्रागडे, अनिता पाटील, सुषमा चोपकर, वंदना कुरडकर सह नप अधिकारी व कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

गोंडेगाव कॉलोनीत साठ हजाराची घरफोडी

Thu Feb 3 , 2022
गोंडेगाव कॉलोनीत साठ हजाराची घरफोडी कन्हान : – वेकोलि वेकेलि गोंडेगाव कॉलोनी येथील रहिवासी प्रदीप प्रफुल बारई हे आपल्या परिवारासह पश्चिम बंगाल येथे गेले होते. परत आल्यावर त्याच्या घराचे कुलुप तोडुन अज्ञात आरोपीने घरफोडी करून चार तोळे सोने, टि व्ही, घडयाळ, शेगडी व नगदी अशा एकुण साठ हजार रुपयांचा मुद्देमाल […]

You May Like

Breaking News

Archives

Categories

Meta