*पीओएस मशीन , माल बोरी च्या वजनात तफावत व कमीशन मिळण्याची मागणी*
रास्त भाव दुकानदार संघटने चे तहसीलदारांना निवेदन
कन्हान – तालुक्यातील राशन दुकानदार बांधवाच्या अडचणी मागील काही दिवसान पासुन वाढले असुन सुद्धा संबंधित अधिकारी या कडे दुर्लक्ष करीत असल्याने रास्त भाव दुकानदार संघटने च्या पदाधिकार्यांनी तहसीलदार प्रशांत सांगडे यांची भेट घेऊन त्यांना एक निवेदन देऊन पीओएस मशीन , माल बोरी च्या वजनात तफावत व कमीशन मिळण्याची मागणी केली आहे .
शासना ने राशन दुकानातील भ्रष्ट्राचाराला आळा घालण्यासाठी बायोमेट्रिक पद्धत अवलंबली असुन सुद्धा तालुक्यात गेल्या काही दिवसान पासुन एनआयसीचे सर्वर डाऊन असल्यामुळे नागरिकांचे व राशन दुकानदारांचे डोकेदुखी वाढली असुन या तांत्रिक अडचणी मुळे नागरिकांना पांच पाच तास रांगेत उभे राहावे लागत आहे . त्यामुळे कार्ड धारक आणि राशन दुकानदार च्या भांडणात वाढ झाली असुन पीएसओ बदल टाकले तर समाधान कारक उत्तर नाही . गोडावुन मधुन आलेला माल बोरी सहित वजना मध्ये खुप तफावत असुन धानाच्या वजन बरोबर मात्रा मध्ये असण्याचा मागणी करिता रास्त भाव दुकानदार संघटने च्या पदाधिकार्यांनी तहसीलदार प्रशांत सांगडे यांची भेट घेऊन चर्चा करुन त्यांना निवेदन देऊन तात्काळ पीओएस मशीन , माल बोरी च्या वजनात तफावत व कमीशन मिळण्याची मागणी केली आहे .
या प्रसंगी रास्त भाव दुकानदार संघटने चे अध्यक्ष रुपंश बोंदरे , उपाध्यक्ष सुनिता मानकर , सचिव गजेंन्द्र सावरकर , घनश्याम कारेमोरे , पुरुषोत्तम पांडे , नितिन हेटे , सिद्धार्थ मेश्राम , वैभव काळे , गंगाबाई गजभिए , सह आदि पदाधिकारी उपस्थित होते .