*ईटगावा तील महीला शेतकरी रमाबाई च्या शेतात बाधलेली एक लाखाची तिन दुधारू गाईची चोरी*.
पारशिवनी (ता प्र):- पाराशिवनी पोलिस स्टेशन हदीतील आठ किलो मिटर अंतरा वारिल ईटगाव येथिल शेतकरी महिला तक्रारदार रमाबाई अशोक मानवटकर वय ३६ वर्ष राहणार इटगाव याला २०१९ मध्ये पंचायत समिति पशु विभागातुन दोन लाल रंगाच्या गाई मिळले होते . प्रत्येकी एक गाय ४०,००० रुपए या प्रमाणे दोन गाई विकत घेतल्या असुन तक्रारदार महीला शेतकरी रमाबाई मानवटकर यांच्या घरची एक गाय दोन वासरे व एक कालवड असे महीला शेतकरी आपल्या गावा जवळील शेतातील गोठ्यात जनावर नेहमी बांधत असते व तक्रारदार रमाबाई मानवटकर यांचे पती अशोक उमाजी मानवटकर हे स्वता सकाळी ईटगाव शिवारातील शेतात गाई ढोरे चारण्याकरिता नेतात व सायंकाळी गाईचे दुध काढुन गावातील गोठ्यात बांधतात .
सोमवार ला रात्री ८:०० वाजता च्या दरम्यान गावातील गोठ्यात रमा बाई मानवटकर यांचे पती अशोक मानवटकर यांनी गाई ढोरे बांधुन घरी आले . मंगळवार दिनांक १ फेब्रुवारी ला सकाळी पहाटे ४:०० वाजता च्या दरम्यान दररोज प्रमाणे रमाबाई मानवटकर यांचे यांचे पती अशोक मानवटकर हे गाईचे दुध काढने करिता गावातील गोठ्यात गेले असता त्यांना गोठ्यात असलेल्या गुरेढोरां पैकी तीन गाई दिसल्या नाही म्हणून रमाबाई मानवटकर यांचे पती अशोक मानवटकर यांनी रमा बाईअशोक मानवटकर ला घरी येवुन सांगितले . त्यानंतर रमाबाई अशोक मानवटकर व यांचे पती अशोक मानवटकर हे दोघेही गोठ्या कडे जाऊन पाहिले व आजुबाजुच्या गावात तसेच शेतात शोध घेतला असता रमाबाई अशोक मानवटकर यांची
१) लाल रंगाची एक गाय चेहऱ्यावर पांढरे ठिपके असलेली किंमत ४०,००० रुपए
२) लाल रंगाची एक गाय किंमत ४०,००० रुपए
३) पांढऱ्या रंगाची एक गाय किंमत २०,००० असे एकुण १,००,००० रुपए गाई मिळुन आले नसुन कोणीतरी अज्ञात चोराने खुल्या गोठ्या बांधुन चोरुन नेल्याने पारशिवनी पोलीसांनी तक्रारदार रमा अशोक मानवटकर यांच्या तक्रारी वरुन अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून गुन्ह्याचा पुढील तपास पारशिवनी पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक सोनवने यांच्या मार्गदर्शनात पोलिस उप निरिक्षक संदिपान उबाळे हे आरोपी चा शोध घेत पुढील तपास करीत आहे .