साटक ला भव्य पशुधन संवर्धनलिंपी रोगावर प्रति बंधक उपाय व मार्गदर्शन वैद्यकीय शिबीर संपन्न
कमलसिंह यादव
पाराशिवनी तालुका प्रतिनिधी
पारशिवनी (ता प्र) : – पशुधन संवर्धन तालुका अधिकारी, पशुधन वैद्यकिय रूग्णालय साटक व ग्राम पंचायत साटक यांच्या सयुक्त विद्यमाने पशुधनावरील लिंपी साथीचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता प्रतिबंधक उपाय म्हणुन मोफत पशुधानाची तपासणी, फवारणी, लशीकरण, उपचार व औषधी वितरण आणि जनजागृती शिबीर संपन्न झाले.
पशुधनावरील लंपी स्किन डिसिज या विषाणुजन्य साथीच्या रोगाचा प्रादुर्भा व वाढल्याने या रोगावर नियंत्रण व रोगा बाबत पशु पालकांमध्ये जनजागृतीपर पारशिवनी तालुका पशुधन संवर्धन वैद्य किय अधिकारी, पशुधन वैद्यकिय रूग्णा लय साटक व ग्रा प साटक याच्या सयुक्त विद्यमाने साटक ला भव्य शिबीराचे उद्घाटन मा ना सुनिलबाबु केदार पशुधन संवर्धन, दुग्ध व शालेय क्रिडा मंत्री यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी सौ रश्मी ताई बर्वे जि प अध्यक्षा, मा तापेश्वर वैद्य सभापती पशुधन जि प नागपुर, डॉ कुंभरे सहआयुक्त पशुधन नागपुर विभाग, डॉ पुंडलिक मॅडम जिल्हा उपाआयुक्त पशुधन नागपुर, डॉ निरंजन शेट्टे जिल्हा पशुधन अधिकारी जि प नागपुर, व्यकट कारेमोरे जि प सदस्य, निकीता भारव्दाज प स सदस्या, सिमाताई उकुंडे सरपंचा,गजानन वांढरे उपसरपंच साटक आदीच्या प्रमुख उपस्थित संपन्न झाले.
ग्रा प साटक ला भव्य पशुधन संवर्ध न वैद्यकीय शिबीरात प्रात्यक्षिकाच्या माध्यमातुन पशुपालकांमध्ये जनजागृतीपर मा ना सुनिलबाबु केदार व पशुवैद्यकीय अधिकारी यांनी या साथीच्या रोगाबाबद प्रतिबंधक उपाय व योजना विषयी परिसरातील पशुपालकांना मार्गदर्शन केले. ४५० पशुधन व त्याच्या गोठयात फवारणी,१४० जनावरांना लशीकरण ईतर ९० जनावरांची तपासणी, उपचार व मोफत औषधी वितरण करण्यात आली. शिबीरास दयाराम भोयर तालुकाध्यक्ष कॉग्रेस कमेटी, , सिताराम भारव्दाज, जिवन चव्हाण, वर्माजी, जौंजाळ सर्व कृ उ बा समिती संचालक, यशंवतराव उकुंडे, रामेश्वर राऊत, राहुल वानखेडे, रविंद्र गुळधे, राजु ठाकरे, आत्माराम उकुंडे, धोटे, कवडु कंभाले, नथुजी चोपकर, रमेश वांढरे, नितीन हारोडे, प्रेमचंद चामट सह परिसरातील पशुपालक, शेत करी, गावकर्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. शिबीराच्या यशस्विते करिता डॉ ठाकुर तालुका पशुधन संवर्धन अधिकारी, डॉ चिमुटे पशुधन संवर्धन अधिकारी साटक, कर्मचारी, ग्रा प साटक कर्मचारी यानी प्रयास केले