*वंसतरावजी नाईक यांचे जिवनकार्यावर आधारीत पाठ शालेय पाठयपुस्तकात समाविष्ठ करा*
*वसंतरावजी नाईक अधिकारी कर्मचारी संघटनेची मागणी
कन्हान ता.2 : आधुनिक व प्रगत महाराष्ट्र ज्यांनी घडविला त्यात सार्वधिक योगदान हे वसंतरावजी नाईक यांचे आहे. त्यांनी महाराष्ट्राचा विकासात्मक पाया एवढा मजबुत रचला होता की त्यामुळे आजही महाराष्ट्र हे देशातील सार्वाधिक प्रगत व विकसित राज्य म्हणून गणले जाते. वंसतरावजी नाईक यांनी महाराष्ट्राला रोजगार हमी योजना , कापूस खरेदी योजना,चार-चार कृषी विद्यापीठांची स्थापना,सत्तेचे विकेंद्रीकरण व्हावे म्हणून जि.प.पं.समिती, ग्राम पंचायत सारख्या स्थानिक स्वराज्य संस्थेची स्थापना, सहकारी साखर कारखाने, सहकारी सुतगिरनण्या तसेच भविष्यातील मुंबई शहराची वाढती लोकसंख्या लक्षता घेता रिक्लेमेशन, नवी मुंबई शहराची निर्मिती, राज्यभर वसंत बांध-बंधारे, सिंचन प्रकल्पाची व विद्यूत प्रकल्पाची निर्मिती नाईक साहेबांच्या काळात झाली.हया व अशा प्रकारच्या अनेक योजना इतर राज्यानी अमलात आणल्या आहेत. याचे उत्तम उदारण म्हणजे “मनरेगा ” होय.
त्यामुळे अशा थोर कर्तबगार नेत्याचे स्मृती जपून ठेवणे हे आजच्या नविन पिढिचे आद्य कर्तव्य आहे.महाराष्ट्रा राज्य शासनाने वर्ग १० , १२ वी च्या पाठ्यपुस्तकात वसंतरावजी नाईक यांच्या जिवन व कार्यावर आधारीत पाठाचा समावेश करावा. या करीता वसंतरावजी नाईक अधिकारी कर्मचारी संघटना महाराष्ट्र, जिल्हा शाखा नागपूर च्या वतीने मा.जिल्हाधिकारी यांच्या मार्फत महाराष्ट्र राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री मा.ना.वर्षा गायकवाड यांना निवेदन पाठविण्यात आले. यावेळी संघटनेचे विभागीय संघटन सचिव राजू चव्हाण, जिल्हा अध्यक्ष प्रा. सुजित चव्हाण, उपाध्यक्ष प्रेमचंद राठोड, सहसचिव कुंदन शेरे, कोषाध्यक्ष गजानन राठोड,मनोज राठोड आदी पदाधिकारी उपस्थित होते.