*शिंगोरी कोळसा खाण प्रकल्पग्रस्तांचे आंदोलन चिघळले
तिसऱ्या दिवशी जेलभरो आंदोलन. पोलीस चोख बंदोबस्तात २० आंदोलनकर्ते ताब्यात व सुटका*.
कमलसिह यादव
पाराशीवनी तालुका प्रातिनिधी
पारशिवनी(ता प्र) : – तालुक्यातील शिंगोरी कोळसा खाण परिसरात प्रकल्पग्रस्त गावकऱ्यांचे आंदोलन चिघळले असून आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी जेलभरो आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलनकर्ते आक्रमक झाल्यामुळे पोलीसांनी २० आंदोलनकर्त्यांना दुपारच्या सुमारास ताब्यात घेऊन सुटका केली आहे. मात्र कोणत्याही वाटाघाटी झाल्या नाहीत. त्यामूळे येत्या काळात तिव्र आंदोलनाचा ईशारा प्रकल्पग्रस्त आंदोलन कर्त्यानी दिला आहे.
शिंगोरी कोळसा खाण दोन वर्षांपूर्वी सुरू करण्यात आली. शिंगोरी, साहोली, डोरली, हिंगणा गावातील शेतकऱ्यांच्या शेकडो हेक्टर जमिनी वेकोलीने अधिग्रहित केल्या मात्र रोजगार देतांना प्रकल्पग्रस्त गावातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांना डावलण्यात आले. शिवाय प्रकल्पग्रस्त गावा अंतर्गत असलेल्या विविध मागण्यांना केराची टोपली दाखविण्यात आल्यामुळे दि. १ ऑक्टोबर पासून शिंगोरी कोळसा खाण परिसरात माजी समाजकल्याण सभापती व कांग्रेसचे जेष्ठ नेते हर्षवर्धन निकोसे यांच्या नेतृत्वात जन आंदोलन सुरू आहे.
१ ऑक्टोबर गुरुवारला वेकोलींच्या काही पदाधिकाऱ्यांनी आंदोलन कर्त्याची भेट घेतली.यावेळी आंदोलनकर्त्यांचे नेते हर्षवर्धन निकोसे व प्रकल्पग्रस्त नागरिकांनी शिंगोरी, साहोली, डोरली व हिंगना गावातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांना स्थानिक कोळसा खाणीत रोजगार देण्याचा प्रश्न उपस्थित केला व उर्वरित मागण्या पूर्ण करण्यासंदर्भात ठोस आश्वासन मागितले.बराच वेळ चर्चा झाली मात्र कोणताही मार्ग निघाला नाही. त्यामुळे जो पर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत तो पर्यंत जनआंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे प्रकल्पग्रस्त आंदोलनकर्ते ठाण मांडून बसले होते. २ ऑक्टोबर शुक्रवार ला गांधी जयंतीचे औचित्य साधून शिंगोरी कोळसा खाण परिसरात शांती मार्च काढण्यात आला. मात्र पोलीस व वेकोलींच्या सुरक्षा रक्षकांनी शांती मार्च रोखून धरल्यामुळे काही काळ तणावाची स्थिती निर्माण झाली होती. आंदोलना च्या तिसऱ्या दिवशी ३ ऑक्टोबर शनिवारला जेलभरो आंदोलन करण्यात आले. यावेळी वेकोली प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. आधीच पोलीसांचा चोख बंदोबस्त असल्यामुळे पोलीसांनी प्रकल्पग्रस्त गावकऱ्यांचे नेते हर्षवर्धन निकोसे यांच्यासह प्रमोद काकडे, अमजद पठाण, माजी सरपंच विजय निकोसे, सुनील तांडेकर, दिलीप बर्वे, भिमराव बागडे, शुभम मेश्राम, सौरभ मारबते, सुरज इंगोले, दिगेश धुर्वे, संदीप गोडबोले, प्रमोद शेंडे, बबलू इंगोले, राहुल चनकापुरे, शुभम लांजेवार, राजेश डोंगरे, विशाल निकोसे, वैभव गेडाम आदीना ताब्यात घेऊन पारशिवनी पोलीस स्टेशन गाठले. यांना कलम ६८ मु पो का अन्वये पोलिस निरिक्षक यांचे आदेशानुसार आवश्यक सर्व कार्यवाही करून काही वेळानंतर आंदोलन कर्त्याना सोडून दिले. यादरम्यान कुंभकर्णी झोपेत असलेल्या वेकोली प्रशासनाकडून प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या संदर्भात कोणतीही चर्चा केली नाही. त्या मुळे प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न “जैसे थे”आहेत. वेकोलींच्या अधिकाऱ्यांना एका राजकीय नेत्यांचे पाठबळ असल्यामुळे वेकोली प्रशासन प्रकल्पग्रस्तांना प्रतिसाद देत नसल्याची माहिती मिळाली आहे.
*शिंगोरी कोळसा खाण बंद करण्याचा ईशारा*
मागील तीन दिवसांपासून शिंगोरी कोळसा खाण परिसरात प्रकल्पग्रस्त गावकऱ्यांचे विविध मागण्यांसाठी जन आंदोलन सुरू आहे. आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी वेकोली प्रशासनाकडून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने जेल भरो आंदोलन करण्यात आले. भारत लोकशाही प्रधान देश आहे. या देशात न्याय व्यवस्था आहे, लोकशाही पद्धतीने मागण्या मांडल्या मात्र प्रतिसाद मिळाला नाही. त्यामूळे आंदोलनाचं हत्यार उपसा व लागलं कोळसा खाण उभारण्यासाठी प्रकल्पग्रस्त गावातील शेतकऱ्यांनी जमिनी दिल्या प्रकल्पग्रस्त भुमिहीन झाले असतांना त्यांच्या कुटुंबातील तरुणांच्या हाताला कामधंदा नाही. त्यामुळे रोजगार देण्याच्या नावावर वेकोली कडून आश्वासन देण्यात आली. मात्र रोजगार दिला नसल्याने एका आठवड्यात प्रकल्पग्रत गावकऱ्यांच्या मागण्या मंजूर करा. अन्यथा एका आठवड्यानंतर उग्र आंदोलन करून शिंगोरी कोळसा खाण बंद कर ण्यात येईल याची सर्वस्वी जबाबदारी वेकोली प्रशासनाची राहील. असा ईशारा प्रकल्पग्रस्त गावकऱ्यांचे नेते हर्षवर्धन निकोसे यांनी दिला आहे.