कांद्री येथे एका महिलेने केले विष प्राषण, उपचारा दरम्यान मृत्यु
कन्हान : – पोलीस स्टेशन अंतर्गत उत्तरेस दोन कि मी अंतरावर असलेल्या वार्ड क्र. एक कांद्री येथे एका महिलेने अज्ञात कारणावरून तांदळात टाकण्याचे औषध प्राषण केल्याने मेडिकल कॉलेज नागपुर येथे उपचारा दरम्यान तिचा मृत्यु झाल्याने कन्हान पोलीसां नी मर्ग चा गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.
प्राप्त माहिती नुसार मृतक महिला सौ निशा आनंद शमशेर वय २८ वर्ष राह. वार्ड क्र.१ हरीहर नगर कांद्री-कन्हान हिने (दि.२८) फेब्रुवारी २०२२ ला रात्री ११:३० वाजता दरम्यान आपल्या राहते घरी कोणत्या तरी अज्ञात कारणाने तांदळात टाकण्याचे औषध (सल्फास) नावाचे विषारी औषध प्राषण केल्याने तिची प्रकृती खराब झाल्याने प्राथमिक उपचारा कन्हान च्या खाजगी रूग्णालयात नेले असता तेथील डॉक्टर ने मेडिकल कॉलेज नागपुर येथे पाठविल्याने वार्ड क्र. २४ रजी. नंबर २३९८९७३ वर (दि.१) मार्च २०२२ ला भरती केले असता उपचारा दरम्यान वार्ड चे डॉ एच ओ सर यांनी तिला तपासुन मृत घोषित केले. मृतका च्या मृत्युचे निश्चित कारण समजुन येणे कामी प्रेताचे पीएम करण्यात आले आहे. मेडीकल रूग्णालयातुन इतर कागद पत्रासह मर्ग डायरी सोबत प्राप्त झाल्याने कन्हान पोलीसांनी फिर्यादी आनंद श्रावण समशेर वय ३२ वर्ष राह. वार्ड क्र.१ हरीहर नगर कांद्री, सरकार तर्फे पोलीस हवालदार विकास बेलसरे सीआर एन आर मेडिकल पोलीस बुथ नागपुर, सरकार तर्फे कन्हान पोलीस शिपाई सचिन सलामे, नापोशि प्रशांत रंगारी यांच्या तक्रारी वरून कन्हान पोलीस स्टेशन ला मर्ग क्र.६/२०२२ कलम १७४ जा फौ अन्वये गुन्हा दाखल केला असुन पुढील तपास कन्हान पो स्टे चे पोलीस निरीक्षक विलास काळे यांच्या मार्गदर्शनात पोलीस हवालदार खुशाल रामटेके हे करीत आहे.