निशुल्क आरोग्य तपासणी शिबीर थाटात संपन्न
कन्हान : – माहुरे हॉस्पिटल कामठी व्दारे डॉ शितल विजय गि-हे क्लीनीक, गणेश मेडीकल स्टोर्स तारसा रोड कन्हान येथे आयोजित निशुल्क आरोग्य तपासणी शिबीरास परिसरातील नागरिकांनी उत्तम प्रतिसाद देत शिबीरांचा लाभ घेतला.
रविवार (दि.३) जुलै ला सकाळी १२ ते सायं काळी ६ वाजे पर्यंत माहुरे हॉस्पिटल कामठी द्वारे आ योजित निशुल्क आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन डॉ शीतल विजय गिऱ्हे क्लीनीक, श्री गणेश मेडिकल स्टोर्स तारसा रोड कन्हान येथे माहुरे हॉस्पिटल कामठी चे डॉ माहुरे यांच्या मार्गदर्शनात शिबीर थाटात सम्पन्न झाले. या वैद्यकीय आरोग्य तपासणी शिबीरात ब्लड प्रेशर, ऑक्सिजन सॅचुरेशन, शुगर, वातरोग, चर्मरोग, स्त्रीरोग, थायराईड आणि हड्डी च्या घनत्वाची तपासणी निशुल्क करण्यात आली. या निशुल्क आरोग्य तपासणी शिबीराचा कन्हान परिसरातील नागरिकांनी उत्तम प्रतिसाद देत शिबीराचा लाभ घेतला. शिबीराच्या यश स्वितेकरिता माहुरे हॉस्पिटल कामठी, डॉ शितल गि-हे क्लिनीक व गणेश मेडीकल स्टोर्स तारसा रोड कन्हान च्या चंमुने सहकार्य केले.