पारशिवनी येथे वन महोत्सव थाटात साजरा

पारशिवनी येथे वन महोत्सव थाटात साजरा

पारशिवनी ते करंभाड रस्त्याच्या दुतर्फावर वृक्षा रोपन व वृक्ष रोपे वाटप. 

कन्हान : – सामाजिक वनिकरण पारशिवनी नाग पुर विभागा व्दारे पारशिवनी ते करंभाड रस्त्याच्या दुतर्फा वर वृक्षारोपन व नगरपंचायात पारशिवनी कार्यालयात वृक्ष रोपे वाटप तसेच विविध कार्यक्रमा च्या आयोजन करून वन महोत्सव दिवस थाटात साजरा करण्यात आला.

वन महोत्सव दिनानिमित्त सामाजिक वनिकरण पारशिवनी नागपुर विभागा व्दारे शुक्रवार (दि.१) जुलै ला नगरपंचायत कार्यालय पारशिवनी प्रांगणात मा. श्रीमती डकरे, नगराध्यक्षा श्रीमती कुंभलकर व इतर मान्यवरांच्या हस्ते वृक्षरोपन करण्यात आले. त्यानंतर शनिवार (दि.२) ला सकाळी.११ वाजता मा. श्रीमती डकरे वनपरिक्षेत्र अधिकारी यांचे मार्गदर्शनात पारसि वनी ते करंभाड रस्ता दुतर्फावर वृक्ष लागवड करण्यात आली. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणुन सभापती सौ. मिनाताई कावळे, उपसभापती श्री चेतनजी देशमुख, सदश्य श्री संदिप भलावी, सदश्या श्रीमती तुळसा दिवेवार, श्रीमती मंगला निंबोने यांच्या हस्ते वृक्षारोपन करण्यात आले. तदंतर नगरपंचायत कार्यालय पारशि वनी येथे समृद्धी योजना अंतर्गत रोपे वाटपाचा कार्य क्रम करण्यात आला. यावेळी प्रामुख्याने कार्यक्रमाचे अध्यक्षा नगराध्यक्षा श्रीमती कुंभलकर, प्रमुख पाहुणे श्रीमती डकरे वनपरिक्षेत्र अधिकारी, वनपाल ठाकरे तसेच इतर मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्र संचालन श्री व्हि जे येरपुडे यांनी तर आभार प्रदर्शन श्री शेंडे यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

कन्हान येथे विद्यार्थी समाधान शिबिराचे आयोजन करा

Mon Jul 4 , 2022
कन्हान येथे विद्यार्थी समाधान शिबिराचे आयोजन करा   धर्मराज शैक्षणिक संस्थेची आग्रही मागणी. कन्हान : – विद्यार्थ्यांना शालेय जीवनात विविध शिष्य वृत्तीसाठी प्रस्ताव सादर करण्यासाठी आवश्यक अस लेल्या कागदपत्रे तयार करावे लागतात. यासाठी कन्हान येथे विद्यार्थी समाधान शिबिराचे आयोजन करावे, अशी मागणी धर्मराज शैक्षणिक संस्थे तर्फे श्री भिमराव शिंदेमेश्राम यांच्या […]

You May Like

Breaking News

Archives

Categories

Meta