प्लास्टिक पिशव्यावर बंदी करण्याकरिता नगर परिषद प्रशासनाला सहकार्य करा- आष्टणकर
नगरपरिषद येथे व्यापारी दुकानदार व प्रशासनाची बैठक संपन्न.
शहरात प्लास्टीक वापरणा-या ग्राहकांवर आणि दुकानदारांना दंडात्मक कारवाई होणार.
कन्हान : – केंद्र शासनाचे पर्यावरण, वने व हवामान बदल मंत्रालयाची अधिसुचना (दि.१२) ऑगस्ट २०२१ नुसार संपुर्ण देशात (दि.१) जुलै पासुन एकल वापर प्लास्टिकच्या उत्पादन, आयात, साठवण, वितरण व वापरावर बंदी घालण्यात आल्याने कन्हान-पिपरी नगर परिषद येथे शहरातील व्यापारी दुकानदार यांच्या शंका व समाधानाची बैठक आयोजित करून, चर्चा, विमर्श करित शहरात प्लास्टिक पिशव्यावर बंदी घालण्याकरि ता न प प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन नग राध्यक्षा करूणा आष्टणकर यांनी ग्राहकांना व दुकान दारांना केले आहे.
राज्यात चार वर्षांपुर्वी सिंगल एकल वापर प्लास्टिकच्या उत्पादनावर बंदी घातली असुन आता पुन्हा केंद्र शासनाच्या अधिसुचनेनुसार एकल वापर प्लास्टिकचे उत्पादन, आयात, साठवण, वितरण आणि वापरावर (दि.१) जुलै पासुन बंदी घालण्यात आल्याने व्यापक स्तरावर लवकरात लवकरच कारवाई करण्या चा नगरपरिषद प्रशासनाने बैठकी मध्ये निर्णय घेतला आहे. प्लास्टिक वापरण्या संदर्भात सरकारने घालुन दिलेल्या नियमांचे उल्लंघन केल्यास २५ हजारांचा दंड आणि तीन महिने कारावासाची शिक्षा देखील आहे.
या पार्श्वभुमीवर कन्हान-पिपरी नगरपरिषद कार्यालय येथे शनिवार (दि.२) जुलाई ला दुपारी १२ वाजता शहरातील व्यापारी, विक्रेते यांच्या शंका व समाधाना ची बैठक नगराध्यक्षा करूणाताई आष्टणकर यांच्या अध्यक्षतेत घेण्यात आली असुन बैठकीची प्रस्तावना सादर करतांना पाणी पुरवठा व जल निस्सारण अभि यंता फिरोज बिसेन यांनी शासनाच्या अधिसुचने बद्दल व कारवाई बद्द्ल माहिती दिली असता व्यापारी दुकान दारांनी प्रशासना सोबत चर्चा केली. प्रशासनाने त्यांचा शंकेचे समाधान केले. या बैठकीत नप नगराध्यक्षा करूणाताई आष्टणकर यांनी व्यापारी दुकानदारांना व ग्राहकांना शहरात प्लास्टिक पिशव्यावर बंदी घालण्या करिता नप प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहान केले. तसेच करण्यात येणाऱ्या कारवाई बद्दल सुचना दिली. बैठकी मध्ये सर्व दुकानदार बांधव उपस्थित झाल्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त करून बैठक संपन्न करण्यात आली. याप्रसंगी अकरम कुरैशी, प्रशांत मसार, सचिन गजभिये, प्रदीप गायकवाड, अझहर सिद्धिकी, नुर मोहम्मद फझलानी, योगेश दुहीजोड, रवी ढोमणे, सोनम नाॅवेल्टी, संजय खोब्रागडे सह आदि दुकानदार बांधव बहु संख्येने उपस्थित होते.
शासनाने या प्लास्टिक वर केली बंदी
ना आईस्क्रिम स्टीक, ना प्लास्टिक प्लेट
प्लास्टिक स्टीकवाले इअर बड्स, प्लास्टिकचे झेंडे, चॉकलेटची प्लास्टिक कांडी, आईस्क्रिमची प्लास्टिक कांडी, थर्माकोल, प्लास्टिकचे कप, प्लेट, ग्लास, चमचा, चाकु, स्ट्रॉ, मिठाईला लावण्यात येणारी प्लास्टिक फिल्म, निमंत्रण पत्रिका, सिगारेटचे पॅकेट, १०० मायक्रॉनपेक्षा कमी पीव्हीसी बॅनर्स, सर्वच प्रकार चे प्लास्टिक बॅग, प्लास्टिकचे पॅकेजिंग मटेरियल आदी साहित्यावर बंदी घातली आहे.