- *पारशिवनीत रक्तदान व कोविड योद्धा सन्मान*
कमलसिह यादव
पारशिवनी तालुका प्रातिनिधी
प्रतिनिधी(ता प्र): पंचायत समिती पारशिवनी, आकाशझेप फाऊंडेशन रामटेक द्वारा संचालित आम्ही भारतीय अभियान व अति विशषोपचार रुग्णालय नागपूर यांचे संयुक्त विद्यमाने पंचायत समिती पारशिवनी येथे दिनांक ३ सप्टेंबरला ऐच्छिक रक्तदान व कोविड योद्धा सन्मान कार्यक्रम पार पडला. यावेळी सभापती मीना कावळे व उपसभापती चेतन देशमुख यांचा आम्ही भारतीय द्वारा सन्मान करण्यात आला तसेच कोरोनाच्या जागतिक संकट काळात देखील रक्तदानातून राष्ट्रीयता व मानवतेचा संदेश देणारे शिक्षक राम धोटे, सुनील कळंबे, मुनेश दुपारे, सूरज शेंडे, संदेश वंजारी यांचेसह १३ रक्तदाता, स्वतःचे जीव धोक्यात घालून नागरिकांना वैद्यकीय सेवा देणारे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल रक्तपेढीचे बीटीओ डॉ. मुकेश वाघमारे, संदीप महाकाळकर, राजेश पाटील, अशोक गिरडे, आकाश बरडे, धीरज बंसोड, रुचिका बीरे, व रक्त संकलन चमू, तसेच तालुक्यातील ५१ ग्रामपंचायतींना पंचायत समिती सभापती मीना कावळे, उपसभापती चेतन देशमुख, बीडीओ प्रदीप बमनोटे, सहाय्यक बोडिओ अनिल, अर्चना भोयर ( जि.प.सदस्या), प.स. सदस्य संदीप भलावी, आम्ही भारतीय अभियानाचे मुख्य संयोजक साक्षोधन कडबे, आकाशझेपचे अध्यक्ष प्रा. अरविंद दुनेदार, कोषाध्यक्ष दिलीप पवार, सुरेंद्र सांगोडे यांचे हस्ते कोविड योद्धा सन्मानपत्र प्रदान करून गौरविण्यात आले. यावेळी सुनील कळंबे सरांनी मरणोपरांत अवयवदान संकल्प केला हे येथे उल्लेखनीय आहे.
कार्यक्रमाला मूनेश दुपारे, देवा तुमडाम, विनोद घारड, पंचायत समिती अधिकारी व कर्मचारी तसेच पत्रकार रुपेश खंडारे, सचिन सोमकुवर, गोंडेगाव सरपंच नितेश राऊत प्रामुख्याने उपस्थित होते. यशवितेसाठी अमूल्य योगदान दिल्याबद्दल प्रा. अरविंद दुनेदार यांनी सर्वांचे आभार व्यक्त मानले.