*शिक्षकांनी नेमक्या कोणत्या आस्थापनेवर काम करावे….*?
*अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचा सवाल.
कन्हान ता.4 : एकीकडे कोविड19 प्रादुर्भावामुळे शाळा बंद असूनही शिक्षकांना शाळेत जाण्याच्या सुचना शिक्षणाधिकारी पासून तर केंद्रप्रमुखापर्यंत सर्वच देत आहेत.ऑनलाईन शिक्षण द्या,पोषण आहार वाटप करा,टिव्ही रेडीओवरचे कार्यक्रम ऐकवा, शाळा बंद शिक्षण सुरू, शाळेबाहेरची शाळा, यासारखे उपक्रम राबवावयास सांगून त्याचा अहवाल व काही पंचायत समितीमध्ये शिक्षकांनी घरोघरी जाऊन शिकवा ,दोन दोन ,चार चार पोरं घेऊन शिकवा,असे आदेश दिल्या जात आहे ,तर काही पंचायत समितीमध्ये शिक्षकांनी दिवसभर शाळेत बसण्याचे आदेश दिले जात आहे सोबतच इतर शालेय माहिती वारंवार मागीतल्या जात आहे तर दुसरीकडे मोठ्या प्रमाणात शिक्षकांना निरंतर सर्व्हेक्षण,कोवीड सेंटर, कोवीड नियंत्रण कक्ष तर कुठे खाजगी दवाखाण्यात शिक्षकांना नियुक्त करून सेवा अधिग्रहीत करून अशा विविध कामी लावल्या जात आहे.
त्यामुळे शिक्षकांनी नेमक्या कोणत्या आस्थापनेवर काम करावे..?हा प्रश्न पडला आहे.एकाच वेळी दोन आस्थापनेवर कसे काय कामकाज केल्या जाऊ शकते…?
24 जून 2020 च्या जी आर मध्ये तथा 17 ऑगस्ट 2020 च्या शुद्धीपत्रकानुसार शिक्षकांना ऑनलाईन शिक्षणासाठी कोविड कामकाजातून कार्यमुक्त करण्याच्या सुचना दिल्या नंतर अजूनही कार्यमुक्त करण्यात आले नाही.
शिक्षक काम करण्यास तयार आहे पण शिक्षकांकडून कोवीडचेच कामकाज करून घ्यायचे असेल तर शाळेतून कार्यमुक्त करण्यात आले नाही.त्यामुळे शिक्षकांची तारांबळ उडत आहे.अशा परिस्थितीत शिक्षण विभाग व आपत्ती व्यवस्थापन विभाग यांनी यातून मार्ग काढण्याची मागणी अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाकडून केली जात आहे.