बी.एस.एन.एल.टावरचा हजारो रूपयांचा मुद्देमाल लंपास
कन्हान,ता.03 सप्टेंबर
कन्हान येथील विकास शाळेचा पटागंणातील भारत संचार निगम लिमिटेडचे टावर असलेल्या अज्ञात युवकांनी एकुण छदोत्तीस हजार, दोनशे रुपयांचा मुद्देमाल चोरुन पसार झाल्याने कन्हान पोलीसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून शोध सुरु केला आहे .
पोलीसांकडून मिळाल्या माहिती नुसार भुषण यशवंत घोरपडे (३८) रा.जरीपटका, नागपुर हा भारत दूरसंचार निगम लि. मध्ये नोकरीवर असल्याने त्याचा अधिकार क्षेत्रात विकास विद्यालय कन्हान येथील प्रमाणित बी.एस.एन.एल टावरची सर्वस्वी जवाबदारी भुषण घोरपडे यांचा कडे आहे. ही घटना रविवार (दि.२७) ऑगस्ट ला रात्री दोन ते सोमवार ( दि.२८) ऑगस्ट ला सकाळी ९.४५ वा.च्या सुमारास अनिल पंधराम टेक्नीशियन यांचे साईड बंद असल्यामुळे विकास शाळेचा पटगंणात असलेल्या बी.एस.एन.एल. टावर जवळ आले. त्यांना टावर चे बाहेरील कुलूप तुटलेल्या अवस्थेत दिसले. सदर घटनेची माहिती अनिल पंधराम यांनी भुषण घोरपडे यांना सांगितल्याने भुषण यांनी घटनास्थळी पोहचुन पाहणी केली. या मध्ये टावर मधील काॅम्बाइल्स ३ नग १९,२०० रू, स्क्रॅप व्हॅल्यु चे ६ नग किंमत १८,००० रु.असा एकुण ३७,२०० रू.चा मुद्देमाल दिसुन न आल्याने कन्हान पोलीसांनी भुषण घोरपडे यांचा तक्रारी वरून अज्ञात आरोपी विरुद्ध कलम ३७९ भांदवि अन्वये गुन्हा दाखल केला. गुन्ह्याचा पोलीस निरीक्षक विलास काळे यांच्या मार्गदर्शनात कन्हान पोलीस आरोपीचा शोध घेत आहे .
Post Views: 786
Sun Sep 4 , 2022
शेतात असलेल्या विस हजारांच्या साहित्याची चोरी कन्हान,ता.03 सप्टेंबर कन्हान शहराचा हद्दीत असलेला बोरडा टोल नाक्या बाजुचा शेतातील खोली मध्ये अज्ञात युवकांनी एकुण विस हजार रुपयांचा मुद्देमाल चोरुन पसार झाल्याने पोलीसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली. ही घटना रविवार (ता.28) ऑगस्ट सांयकाळी पाच […]