स्व. इंदिरा गांधी राष्ट्रीय सेवारत्न पुरस्काराने कु पायल येरणे सन्मानित

स्व. इंदिरा गांधी राष्ट्रीय सेवारत्न पुरस्काराने कु पायल येरणे सन्मानित

#) गोल्डन केअर क्लब, बंगळूर व्दारे ऑनलाईन  पुरस्कार सोहळा सम्पन्न. 


कन्हान : – पासुन पुर्वेस १२ कि मी लांब असलेल्या  बोरी (सिंगोरीृ) येथील शिवशक्ती अखाडा प्रमुख कु पायल येरणे ला कर्नाटक राज्यातील बंगळूर येथील ” गोल्डन केअर क्लब ”  व्दारे स्व. इंदिरा गांधी राष्ट्रीय सेवारत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 

       शनिवार दि.३१ आक्टोबर २०२० ला भारताची प्रथम महिला पंतप्रधान तथा आर्यन लेडीज म्हणुन जगविख्यात असलेल्या महिला स्व इंदिरा गांधी यांचा पुण्यतिथी दिना निमित्त्याने आपल्या नागपूर जिल्हा, पारशिवनी तालुक्यातील बोरी (सिंगोरी) या छोटयाश्या गावातील रहिवासी युवा नेतृत्व, शिवशक्ती आखाडा प्रमुख कु पायल येरणे (२३) यांना कर्नाटक राज्यातील बंगळूर येथील ” गोल्डन केअर क्लब ” संस्थे मार्फत सामाजिक कार्यात आगळी वेगळी कामगिरी करून विशेष कार्य केल्या बद्दल ” स्व इंदिरा गांधी सेवारत्न पुरस्कार २०२० ” हा राष्ट्रीय पुरस्कार ऑनलाईन पद्धतीने प्रदान करून सन्मानित करण्यात आले.  

       कु पायल येरणे हिने स्व इंदिरा गांधी राष्ट्रीय सेवा रत्न पुरस्कार प्राप्त करून आई, वडील आणि गावाचा नावलौकीक केल्याबद्दल ग्रा प बोरी (सिंगारदिप) सरपंच सुभाष नाकाडे, उपसरपंच रविंद्र दोडके, मुख्याध्यापक शांताराम जळते, पोलीस पाटील अजय ईखार सह सर्व ग्रा प सदस्य व गावक-या तर्फे अभिनंदनाचा वर्षाव करण्यात येत आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

गहूहिवरा येथे ग्राम संपर्क अभियानाचे आयोजन

Wed Nov 4 , 2020
* गहूहिवरा येथे ग्राम संपर्क अभियानाचे आयोजन *पंजाब नॅशनल बॅकेचा वतीने मास व सेनीटाझर वितरण कन्हान :  कन्हान शहरात अंतर्गत गहूहिवरा गावात पंजाब नॅशनल बॅंक कन्हान शाखाचा वतीने आत्मनिर्भर भारत योजनेंतर्गत ग्रामपंचायत गहूहिवरा येथे ग्राम संपर्क अभियानाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी प्रबंधक गोपाल धोंगडी व अशुतोष रामटेके यांची प्रमुख उपस्थिती […]

You May Like

Breaking News

Archives

Categories

Meta