ग्रामपंचायतींच्या माध्यमातून ग्रामीण भागाचा विकास, हाच भाजपाचा निर्धार..!
– डॉ. आशिषराव र. देशमुख
सावनेर : “भाजपा हा एकमेव पक्ष आहे, ज्याने ग्रामीण क्षेत्राच्या विकासासाठी अनेक योजना राबविल्या आहेत. खरा भारत हा ग्रामीण भागात वसतो, हे सत्य आहे. पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वात संपूर्ण भारतात विकासाची मोठी कामे होऊन देश आज जगातील पाचवी मोठी अर्थव्यवस्था म्हणून उदयास आला आहे. महाराष्ट्रात श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजपाने शहरी भागासोबतच ग्रामीण भागातही विकासाची मोठी कामे करून जनतेच्या प्रगतीसाठी प्रयत्न केले आहेत. भाजपाने अनेक योजना ग्रामीण भागांसाठी आणल्या असून ग्रामपंचायतींच्या माध्यमातून त्या जनतेपर्यंत पोहोचविण्यात आल्या आहेत. या ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपा समर्थित पॅनलच्या सरपंचपदाचे उमेदवार आणि इतर सदस्यांना निवडून दिल्यास भाजपाचे विकासात्मक कार्य आणखी मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागात पोहोचेल आणि भाजपाच्या लोकहितार्थ योजनांचा लाभ सर्व जनतेला मिळेल. प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेच्या माध्यमातून समाजाच्या प्रत्येक घटकाची प्रगती शक्य झाली आहे. महिला सशक्तीकरण, विद्यार्थ्यांचे शिक्षण, शेतकरी, अबाल-वृद्ध, व्यवसाय, सिंचन, पाणी, वीज, रस्ते या मुलभूत विषयांवर भाजपाने गंभीरतेने काम केले असून याचा लाभ ग्रामीण जनतेला मिळत आहे. उज्ज्वला गॅस योजना, महिलांसाठी मोफत बससेवा, युवकांसाठी कौशल्यविकास, घरकुल योजना अशा अनेक योजना भाजपाने जनतेच्या कल्याणासाठी राबविल्या. ग्रामपंचायतींच्या माध्यमातून ग्रामीण भागाचा विकास, हाच भाजपाचा निर्धार”, असे वक्तव्य भाजपाचे प्रवक्ते माजी आमदार डॉ. आशिषराव र. देशमुख यांनी केले. ०३ नोव्हेंबरला सावनेर तालुक्यातील वाकोडी, अजनी, धापेवाडा येथे आयोजित जाहीर सभांमध्ये ते बोलत होते.
राज्यात ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी ५ नोव्हेंबरला मतदान होणार आहे. त्यानिमित्याने भाजपाचे प्रवक्ते माजी आमदार डॉ. आशिषराव र. देशमुख यांनी नागपूर जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणूक प्रचाराची धुरा सांभाळली. त्यांनी दि. ०३ नोव्हेंबर २०२३ ला सावनेर तालुक्यात ठिकठिकाणी जाहीर सभा आणि बैठकींच्या माध्यमातून प्रचंड जनसंपर्क साधला. वाकोडी येथे सरपंच पदाचे उमेदवार सौ. रुपालीताई कोहळे व इतर सदस्यांच्या प्रचारार्थ, अजनी येथे सरपंच पदाचे उमेदवार श्री. उमेश कमाले व इतर सदस्यांच्या प्रचारार्थ आणि धापेवाडा येथे सरपंच पदाचे उमेदवार सौ. निशाताई खडसे व इतर सदस्यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभांमध्ये त्यांनी भाषण केले आणि भाजपा समर्थित पॅनल आणि उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन केले. यावेळी त्यांच्यासोबत भाजपाचे डॉ. राजीवजी पोतदार तसेच अनेक मान्यवर नेतेमंडळी उपस्थित होते.
Post Views: 1,134
Sat Nov 4 , 2023
*विद्यापीठ महिला हाॅलीबाॅल स्पर्धेत सावनेरचे डाॅ.हरिभाऊ आदमने महाविद्यालय विजेता* सावनेर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ आयोजित नुकत्याच पार पडलेल्या महिला व्हॉलीबॉल स्पर्धेमधे डॉ.हरिभाऊ आदमने कॉलेज सावनेर ह्यांनी विजेते पद पटकावलेले आहे. सदर्हू स्पर्धा विद्यापीठाद्वारे आयोजित असून ती जी.एस. कॉमर्स कॉलेज ,वर्धा येथे घेण्यात आली.या मैदानावर संपन्न झालेल्या महिला […]