वराडा शेत शिवारात बिबटयाने बाधलेल्या जर्शी कारवड व वासरा ची शिकार केली
कन्हान : – पारशिवनी तालुकातील वराडा शेत शिवारात कोठया जवळील जागेवर बाधलेल्या जर्शी गाय कारवळ व वासरा ला एका बिबटयाने सोमवारी पहाटे हल्ला करित जर्शी कारवळ ला ठार केले तर वासरा ला गंभीर जख्मी केल्याने ही परिसरातील तिसरी घटना घडल्याने ग्रामस्था मध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
वराडा शेत शिवारात सोमवारी पहाटे सकाळी बिबटयाने धुमाकुळ करित गुरांची शिकार केल्याने पेंच व कन्हान नदी काठालगत असलेल्या शेत शिवारातील या तिस-या घटनेने मेंहदी, बखारी, नांदगाव, एंसबा, घाटरोहना, जुनीकामठी, गाडे घाट, पिपरी च्या ग्रामस्थ शेतक-याच्या प्राळीव जनावरांना बिबटया धुमाकुळ करित शिकार करित असल्या ने शेती कामाचे दिवस असल्याने ग्रामस्था मध्ये भिती चे वातावरण निर्माण झाले आहे. ही घटना पेच व्याघ्र प्रकल्पाच्या रामटेक वन परिक्षेत्र अंतर्गत पटगोवारी रेज मध्ये येत असुन वराडा येथील पिडित शेतकरी बाळकृष्ण राजारामजी घोडमारे यांचे मालाकी चे ८ ते ९ प्राळीव जनावरे शेत शिवारात राहत असुन रविवार (दि.२) जानेवारी रात्री जर्शी कारवळ दुधाळु व वासरू तसेच ८ ते ९ पाळीव जनावरे कोठयात बाधुन आपल्या घरी आले.
दररोज प्रमाणे सोमवार (दि.३) ला सकाळी शेतात गेले तर त्याना दिसले की रात्री पहाटे सकाळी बिबटयाने शेता त येऊन कोठया जवळ बांधलेली तीन वर्षाची जर्शी गाय कारवळ व वासराची शिकार केली. कारवळ बिबट्याच्या तावडीतुन सुटले मात्र जखमी करून काही अंतरावर नेऊन शिकार केल्याने तिचा मुत्यू झाला. व वासराला पंजा व दांताचे सहायाने गंभीर जख्मी केले. घटनेची माहीती पिडीत शेतकरी बाळकृष्ण घोडमारे यांनी गावच्या नागरिकानी वन विभाग पटगोवारी चे वनरक्षक श्री एस जी टेकाम यांना भ्रमणध्वनी व्दारे दिली. तात्काळ वनरक्षक एस जे टेकाम यांनी वरिष्ठ अधिकारी वनक्षेत्र सहायक ए.सी.द्विग्रेसे साहेब यांना दिल्याने वनक्षेत्र सहायक अधिकारी ए सी दिग्रेसे स्वतः वनरक्षक एस जे टेकाम व दोन पंचाना सोबत घेऊन घटनास्थळी पोहचुन निरिक्षण करून पंच १) महादेव जंगलु मंदिरवाडे राह. पटगोवारी, २) आकाश दामुजी शेडें राह. रामटेक या पंचाच्या साहयाने पंचनामा करू न शवविच्छेदनास पंचायत समिती पारशिवनी चे वरिष्ठ पशुवैद्यकिय अधिकारी डॉ ठाकुर यांना पाठवुन शव विच्छेदन करून अहवाल वन विभागाचे श्रेत्र सहायक अधिकारी ए सी दिग्रेस व वनरक्षक एस जी टेकाम याना दिला.
पेंच व्याघ्र प्रकल्पातुन येणा-या पेंच नदी व पेंच नदी कन्हान नदीत संगम झाल्याने या एक ते दिड महि न्या पासुन पेंच व्याघ्र प्रकल्पातील बिबटया पेंच व कन्हान नदी काठालगत असलेल्या शेतशिवारात धुमा कुळ घालुन तीन घटनेत सहा प्राळीव जनावरांची शिकार करू शेतक-याचे नुकसान केले. असल्याने सुटलेल्या बिबटयाला वनविभागाने त्वरित पकडुन दाट वनात सोडुन शेतक-याना भयमुक्त करून दिलासा दयावा. आणि वराडा येथील पिडीत शेतकरी बाळकृ ष्ण राजाराम घोडमारे यांच्या जर्शी गाय कारवळ शिकारीत मुत झाल्याने बाजार भाव प्रमाणे अंदाजे २२ हजार रुपयाचे नुकसान झाल्याने त्वरित नुकसान भरपाई देण्यात यावी. अशी मागणी समस्थ गावकरी, शेतकरी च्या वतीने सरपंचा विद्याताई चिखले हयांनी वनरक्षक अधिकारी श्री ए सी दिग्रेसे साहेब यांचे व्दारे वन विभागास केली आहे.