७राज्यस्तरीय पुरस्काराने कल्याणी सरोदे यांचा गौरव
कन्हान ता.5 मार्च
रिसिल डॉट इनच्या वतीने दिला जाणारा सन
2021 चा बेस्ट मेकअप आर्टिस्ट राज्यस्तरीय पुरस्कार
कल्याणी सरोदे यांना जाहीर झाला असून रविवार दि.
28 फेब्रुवारी 2021 रोजी नाशिक येथे पुरस्काराचे सम्मानीत करण्यात आले.
सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री कॉफी आणि बरच काही, मितवा, सांग नारे, रेडिमिक्स, पवित्र रिस्ता, अजिंक्य मराठी चित्रपटाच्या अभिनेत्री ( कलाकार) प्रार्थना बेहेरे यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
याप्रसंगी रिसील संस्थेचे संस्थापक सुधीर कुमार यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करत 4100 नामांकन प्राप्त होऊन 80 उदयोजकांचा गौरव करण्यात आले.
त्यापैकी मेकअप आर्टिस्ट पुरस्कार कल्याणी सरोदे यांना जाहीर करण्यात आला. हा पुरस्काराने सम्मानीत झाल्याने अनेक माध्यमातून व कलाक्षेत्रातुन कल्याणी सरोदे हीचे कौतुक होत आहे.
कल्याणी सरोदे ही मेकअप आर्टिस असुन समाजसेवी म्हणुन संताजी तेली समाज बिग्रेड नागपुर जिल्हा महिला आघाडीच्या उपाध्यक्ष पदावर आहे. अनेक पुरस्कार प्राप्ती बडकवणारी कल्याणी सरोदे यांनी याप्रसंगी समाजातील आणी इतर मुलीनी कुणा कडुन अपेक्षा न करता स्वतः आत्मनिर्भर होऊन समोर वाढायला सांगीतले.