पक्षी पाऊ पात्र वितरण करून मा. प्रकाश भाऊ जाधव यांचा वाढदिवस साजरा.
कन्हान : – ग्रामोन्नती प्रतिष्ठान नागपुर, मुख्य कार्यालय कन्हान-पिपरी व्दारे प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष व माजी खासदार प्रकाश भाऊ जाधव यांच्य वाढदिवसी पर्यावरणात पक्षी महत्वाचा घटक असल्याने तपत्या उन्हाळयात प्रत्येकांने आपल्या घरावर, झाडावर पक्ष्यां करिता पिण्याच्या पाण्याची सोय करावी या सार्थ हेतुन पक्षी पाऊ पात्र वितरण करून वाढदिवस साजरा करण्यात आला.
सोमवार (दि.५) एप्रिल ला ग्रामोन्नती प्रतिष्ठान नागपुर व रामटेक क्षेत्राचे माजी खासदार मा. प्रकाश भाऊ जाधव यांच्या वाढदिवसी ग्रामोन्नती प्रतिष्ठान नागपुर मुख्यालय कन्हान-पिपरी व्दारे दुपारी १२ वाजता कन्हान येथे कोविड-१९ प्रतिबंधक नियमाचे पालन करून छोटेखानी कार्यक्रमा अंतर्गत मनुष्य जिवन तर अनमोल आहेच तसेच पर्यावरणातील महत्वाचा घटक चिमणी, पाखरे या पक्ष्यांचे सुध्दा या तपत्या उन्हाळयात संरक्षण व्हावे या सार्थ हेतुने पक्षी पाऊ पात्र नगर प्रतिनिधीना वितरण करून स्वत: व नागरिकांच्या घरावर, झाडावर व्यवस्थित पात्र ठेवुन दररोज पाणी, दाणे टाकुन पक्ष्यांचा पाऊ घरोघरी निर्माण व्हावे या करिता पक्षी पाऊ पात्र वितरण करून मा. प्रकाश भाऊ जाधव यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. याप्रसंगी राजु तुमसरे नागपुर, उत्तम कापसे सावनेर, राजु बारई मौदा, गोकुल पाटील, हरिश सदुपाडे रामटेक, धनराज चकोले निलज, प्रशांत ईखार, बोरी, अशोक टोहणे, विलास खोब्रागडे आदीने प्रामुख्याने उपस्थित होऊन शुभेच्छा दिल्या. ग्रामोन्नती प्रतिष्ठान नागपुर मुख्यालय कन्हान-पिपरी चे नगर प्रतिनिधी मोतीराम रहाटे, दिलीपराव राईकवार, गणेश भोंगाडे, गोविंद जुनघरे, महेश काकडे , सतिश साळवी, प्रविण गोडे, निलेश गाढवे टेकाडी, केतन भिवगडे, प्रशांत येलकर, प्रविण माने, रविंद्र चकोले निलज, प्रतिक जाधव, श्याम मस्के कांद्री, जिवन ठवकर, निशांत जाधव, रितेश जनबंधु आदी सहकार्य केले.