*नयाकुंड वळणा वर वारंवार अपघात.नयाकुंड वळणावर बसस्टाप व पानटपरी वर ट्रक चढला. चालक व क्लीनर फरार आईसक्रिम विक्रेता ची दुचाकी चकनाचुर चालक जख्मी*.
*पारशिवनी*(ता प्र) : – आमडी फाटा ते पारशिवनी दोन पदरी सिमेंट रस्त्यावरील पेंच नदी काठावर नयाकुंड गावाजवळील बसस्टाप व पानटपरी वर एल वळणावर सुचना फलक, गतिरोधक, रस्ता दुभाजक नसल्याने चालकांचे वाहनावरील संतुलन बिघडुन अपघाताचे प्रमाण वाढ ल्याने राज्यमार्ग अधिका-यांनी त्वरित उपाययोजना कराव्यात अन्यथा रास्तारोको करण्याचा इशारा नयाकुङ च्या सरंपच व गावकरी हयानी संबंधित अधिकारीयांना दिला आहे.
रामटेक, आमडी फाटा- पारशिवनी दोन पदरी सिमेंट राज्यमार्गावर वाहनाची चांगलीच वर्दळ असुन पेंच नदी काठावर असलेल्या नयाकुंड गावाला लागुनच हा रस्ता असुन एल वळण असुन एकीकडे दुकाने, घरे असल्याने लोकांची ये-जा सुरू असते. सिमेंट रस्ता बनल्यापासुन नयाकुंड गावाजवळ वाहन चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटुन अपघाताचे प्रमाण वाढत आहे. या अपघात जिवहानी व मालहानी होत आहे. असेच (३मई)व (दि.५) ला कोळसा व कांद्याचा ट्रक पलटला होता आज पुन्हा एका माहिनात तिसरायंदा आज सायंकाळी ट्रक क्रमाक M H 08 W 8476 हा ट्रक ने नयाकुङ शासाकिय संपती बसस्टाप ला तोङुन गावात राहणारे श्री पाटील यांचे चायपानटपरी ला नुकसान केले तसेच गावात फिरून आईसक्रिम विकणारा अनुज इद्रोज आहिरवार वय२७वर्ष, राहणार न्यु येरखेडा कामठी हा किरकोळ जख्मी झाला व त्याची दुचाकी क्रमाक M H 40 A N 4843 हि ट्रक खाली येऊन चकनाचुर झाली दुचाकी चालकाचा जिव वाचला ,परंतु यात ट्रक चालक व क्लीनर दोघेही ट्रक सोडुन पसार झाले ,गावातील नागरिकानी पोलीसाना माहीती देऊन बोलाविले.घटना स्थळी हे जॉं बाबापोषक मेश्राम ,सिपाही बादल गिरी चालक सिपाही आ|लिक घटना स्थळी पोहचल व घटना स्थळी चा पंचनामा करुन ट्रक ला क्रेन च्या सहायने बसस्टाप बरून बाहेर काढले व पुढील तपास पोलिस निरिक्षक संतोष वैरागडे यांचे मार्गदर्शनात ६ ल्कॉ बाबापोषक मेश्राम सह बादल गिरी सध्या पुढील तापास करीत आहे .तसेच गावकन्यानी मागणी एच जी इंजिनियरिगं कंपनी ला मागणी केली की नयाकुंड गावाजवळील रस्त्यावरील एल वळणावर सुचना फलक, गतिरोधक, रस्ता दुभाजक नसल्याने चालकांचे वाहनावरील संतुलन बिघडुन बारंबार अपघात होत असल्याने त्वरित योग्य उपाय योजना करून तसेच पेंच नदी पुलावर रात्रीला आंधार असल्याने हॉयमास लॉईट लावण्यात यावा. प्रशासनाने गंभीरतेने लक्ष न दिल्यास गावकन्यानी चक्काजाम आंदोलन करण्याचा ईशारा दिला आहे.