सावधान, बिबट्याने मुक्काम ठोकला कांन्द्रीत कांद्रीत बिबट आढळुन आल्याने परीसरात खळबळ 

सावधान, बिबट्याने मुक्काम ठोकला कांन्द्रीत

कांद्रीत बिबट आढळुन आल्याने परीसरात खळबळ

कन्हान, ता.०५ 

     वेकोलि कामठी खुली कोळसा खदान कांद्री वार्ड क्र. २ च्या लोकवस्ती जवळील नाल्यालगत ओबी माती डम्पींग केली आहे. याच नाल्याजवळ सकाळच्या सुमारास मादी बिबट आढळुन आल्याने परिसरात खळबळ उडाली होती. नागरिका मध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याने वनविभाग व पोलीस विभागाला पाचारण करण्यात आले होते.

   मंगळवार ( दि.४) मे ला सकाळच्या सुमारास नागरिकांना मादी बिबट आढळुन आल्याची माहिती कांद्री गावात वा-या सारखी पसरताच नागरिकांनी बिबट ला पाहण्याकरिता नाल्याजवळ मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.

     आपदा मित्र श्याम मस्के यांनी घटनेची माहिती कन्हान पोलीसांना व वनविभाच्या अधिका-यांना दिल्याने संबधित अधिका-यांनी घटनास्थळी पोहचुन नागरिकांच्या जमलेल्या गर्दी ला कमी करुन बिबट्याला रेस्क्यु करण्याचा प्रयत्न केला. परंतु सायंकाळ पर्यंत वनविभागाच्या अधिका-याना बिबट्याला पकडण्यात यश आले नाही. परंतू वनविभागाचे कर्मचारी त्याला पाहण्यासाठी (पाहतीवर) ठेवण्यात आले आहे. अशी माहिती सुत्रांकडून प्राप्त झाली आहे.


वेकोलि कामठी खुली कोळसा खदान व्दारे कांद्री गावाला लागुनच असलेल्या नाल्या लगतच ओबी माती डम्पींग करून उंच टेकडया तयार करण्यात येत असल्याने हा नाला छोटा झालेला आहे. पाण्या च्या शोधात गावातील आणि जंगली प्राणी येथे पाणी पिण्याकरिता येत असतात. त्याच प्रमाणे मंगळवार ला या कांद्रीच्या नाल्यात बिबट चे नागरिकांना दर्शन झाल्याने लागुनच असलेली कांद्रीच्या लोकवस्ती मधिल नागरिकात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

तीसरा वर्धापन दिनी ग्राहकांनी केला युनिटी रिलीटीजच्या जल्लोषात स्वागत  धम्मदीप खोब्रागडे नाव घेऊन किशोर तांडेकर भावुक, युनिटी रिलीटीज वर्धापन दिन  रिअल इस्टेट व्यवहारांमध्ये पारदर्शकता व रोजगार मुख्य भूमिका - धम्मदीप खोब्रागडे

Thu Jun 13 , 2024
तीसरा वर्धापन दिनी ग्राहकांनी केला युनिटी रिलीटीजच्या जल्लोषात स्वागत  धम्मदीप खोब्रागडे नाव घेऊन किशोर तांडेकर भावुक, युनिटी रिलीटीज वर्धापन दिन  रिअल इस्टेट व्यवहारांमध्ये पारदर्शकता व रोजगार मुख्य भूमिका – धम्मदीप खोब्रागडे कन्हान, ता.११ जून       युनिटी रिलीटीज कंपनी रिअल इस्टेट व्यवहारांमध्ये पारदर्शकता, रोजगार व जन सामान्य माणसाच्या गरजा यशस्वीरीत्या […]

You May Like

Breaking News

Archives

Categories

Meta