वीज पडून दोघांचा मृत्यू, तीन जखमी कांद्री व नीलज शिवारातील घटना

वीज पडून दोघांचा मृत्यू, तीन जखमी

कांद्री व नीलज शिवारातील घटना

कन्हान, ता. 5 ऑगस्ट

विजांच्या गडगडाटासह असलेल्या मुसळधार पावसादरम्यान अचानक शेतशिवारात वीज पडल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाला तर तिघे गंभीर जखमी आहे. ही घटना कांद्री व नीलज शिवारात आज गुरुवारी दुपारच्या सुमारास घडली. राधेलाल भीमराव डहारे (२५), रा.आजनी,फेटाणेची, ता. रामटेक व नंदाबाई
आजनी रामकृष्ण खंडाते (३२), रा.नीलज, ता. पारशिवनी अशी मृतकांची नावे आहे.
प्राप्त माहितीनुसार कन्हान परिसरात आज दुपारी विजांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. अशातच कांद्री-बोरडा टोल नाक्यामागील शेतात धानाची रोवणे करीत असलेल्या राधेलाल डहारे या मजुराचा अंगावर वीज पडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला तर सोबत काम करीत असणारे दोन मजूर जखमी झाले. दुसऱ्या घटनेत दुपारी ४.३० वाजताच्या सुमारास नीलज ( खंडाळा) शिवारातील एका शेतात धान रोवणी करत असलेल्या महिला शेतमजूर नंदाबाई खंडाते यांच्या अंगावर वीज पडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला तर त्यांच्यासोबत काम करीत असलेली रेखा मुकेश चौधरी (३५), रा. नीलज ( खंडाळा) ही गंभीर जखमी असून तिला उपचारार्थ कन्हान येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

शितला माता मंदिर कांद्री-कन्हान व्दारे राघव चौकसे याचा सत्कार 

Fri Aug 5 , 2022
  शितला माता मंदिर कांद्री-कन्हान व्दारे राघव चौकसे याचा सत्कार कन्हान, ता.05 ऑगस्ट      एडिफाई शाळेचा विद्यार्थी  राघव संजय चौकसे याने दहावीच्या सीबीएससी बोर्ड परिक्षा मध्ये ९२.४० % टक्के गुण घेत प्राविण्य प्राप्त केल्याने शितला माता मंदिर कांद्री-कन्हान ट्रस्ट द्वारे राघव चौकसे याचा  पेन व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात […]

You May Like

Breaking News

Archives

Categories

Meta