तपस्या फाऊंडेशन रामटेक व्दारे वृक्षारोपण
कन्हान, ता.5 ऑगस्ट
तपस्या फाऊंडेशन रामटेक, अखिलेश हायस्कूल व ग्रामपंचायत साटक यांच्या संयुक्त वतीने ग्रामपंचायत साटक येथील सिद्ध हनुमानजी मंदिराच्या प्रांगणात वृक्षारोपण करण्यात आले.
शालेय कार्यक्रमात विद्यार्थी व शाळेतील शिक्षक प्रदीप निरे, कैलास बी हुमणे सर, अनमोल मेश्राम सर तसेच गावातील ज्येष्ठ नागरीक टेकचंद हिंगणकर, गोविंदा बर्वे, आशिष देशमुख, आदींनी वृक्षारोपण केले. सरपंच सौ.सीमाताई उकुंडे, तपस्या फाऊंडेशन रामटेकच्या अध्यक्षा सौ.सरिता बिरो, मुरली वाणिभस्मे, कृष्णा देशमुख व इतर ग्रामस्थांनी ग्रामपंचायत साटक कार्यालयाच्या इमारतीच्या मैदानात वृक्षारोपण केले. तपस्या फाऊंडेशनचे संरक्षक कैलास बिरो ग्रामस्थांनी जास्तीत जास्त झाडे लावून गाव सुंदर बनवण्याचे आव्हान करण्यात आले. नारायण कुंबळकर, रमाकांत मुरमुरे, तरुण बर्वे, गजानंदजी वांद्रे, गोविंदा बर्वे, चिंटू वाकुडकर, प्रमोद मोहटकर, अंकित देशमुख, अक्षय आकरे, अरुण लोढे, निकेश हारोडे, मनोज लक्षणे, जितू हिंगणकर व इतर ग्रामस्थ उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रमाचे छायाचित्रण आकाश तिवडे रामटेक यांनी केले असून कार्यक्रमाचे संचालन खुबलाल यादव यांनी तर आभार चिंटू वाकुडकर यांनी मानले.
Post Views: 770
Sat Aug 6 , 2022
जे.एन.रूग्णालयात नेत्र तपासणी व मोतीबिंदु शस्त्रक्रिया शिबीर संपन्न शिबीरात १९७ नेत्र तपासणी व ९७ मोतीबिंदु शस्त्रक्रिया एकुण २९४ नागरिकांना लाभ. कन्हान,ता.06 ऑगस्ट जवाहरलाल नेहरू हाॅस्पीटल कांद्री येथे वेस्टर्न कोल फिल्डस लिमिटेड नागपुर व महात्मे आय बॅंक, आय हाॅस्पीटल नागपुर यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदु शस्त्रक्रिया […]