बस-कार अपघातात एकाचा मुत्यु , तर  6 गंभीर जख्मी

बस-कार अपघातात एकाचा मुत्यु , तर  6 गंभीर जख्मी

 सावनेर : सावनेर तहसिल केलवद पोलिस स्टेशन अंतर्गत एसटी बस व स्विफ्ट कार च्या आमोरासामोर टक्कर झाल्याने एका युवकाचा घटनास्थळावरच मृत्यु तर गंभीर जखमीना उपचार हेतु ग्रामीण स्वास्थ्य प्रशिक्षण केन्द्र सावनेर आणण्यात आले.  प्राप्त झालेल्या माहितीनुसार सावनेर छिंदवाडा मुख्यमार्गवर केलवद थाना अंतर्गत परसोडी शिवारात उमरेड डेपो ची एस टी बस क्र . एम एच ४० एन ९९९२ सावनेर कडुन मध्यप्रदेश छिंदवाडा दिशेन जात असता विरुद्ध  दिशेने स्वीफ्ट कार क्र . एम एच ४० सी एच ०११८ मधिल तरुण चमत्कारिक हनुमान मंदीर जामसावळी वरुन दर्शन करुन नागपुर परतीवर असतांनी केलवद थाना अंतर्गत सात किमी अंतरावर परसोडी शिवारात अचानक दोन्ही वाहनांची आमोरासामोर टक्कर झाल्याने मोठा अपघात घडल्याचे प्रत्यक्षदर्शी ने सांगितले . स्विफ्ट कार मधील  मृतक अभिकेत प्रभाकर लिचडे  वय २५  रा. राजीव नगर सोमलवाडा  तर  जखमी  निर्भय संजय चन्ने  (वय २५) रा. राजीव नगर सोमलवाडा नागपुर,  पियुष विजय बांगडे  वय २५ रा. राजीव नगर सोमलवाड,शुभम सम्राट ठाकरे , रा नागपुर असे आहेत.

  बसमधील ३-४ जण प्रवासी जखमी झालेले आहेत. घटनेची माहिती मिळताच केळवद पोलीस ठाण्याचे प्रभारी अमित आत्राम, हितज्योती फाऊंडेशनचे संस्थापक हितेश बनसोड, तुषार महल्ले, लाला साबळे आदींनी त्यांच्या पथकासह धाव घेतली. घटनास्थळी जाऊन जखमी तरुणाला उपचारासाठी रुग्णालयात पाठवले.  जिथे डॉक्टरांनी तपासणी करून एका तरुणास मृत  घोषित केले आणि इतर जखमीवर प्राथमिक उपचार करून त्यांना नागपूरला पाठवले.  सावनेर वरून छिंदवाडा कडे जाणारा मुख्य मार्ग काही ठिकाणी खराब व मोठमोठे खड्डे पडले असल्यामुळे ही घटना घडली असे प्रत्यक्षदर्शी व सुत्रांच्या निदर्शनास आली आहे.केळवद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्यानंतर पुढील तपास सपोनि अमितकुमार आत्राम यांच्या मार्गदर्शनात पीएसआय कामटे, एएसआय किशोर ठाकरे , नां पो शि रविंद्र चटप व इतर करीत आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

कन्हान येथे तीन दिवसीय भीम महोत्सवचे आयोजन

Fri Nov 11 , 2022
कन्हान येथे तीन दिवसीय भीम महोत्सवचे आयोजन   कन्हान,ता.११ नोव्हेंबर रिपब्लिकन सांस्कृतिक संघ कन्हान च्या वतीने ११ ते १३ नोव्हेंबर पर्यंत डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक कन्हान येथे भीम महोत्सवचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे उद्घाटन भदंत आर्य नागार्जुन सुरई ससाई यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. ११ नोव्हेंबरला सायंकाळी सहा वाजता भगवान […]

You May Like

Breaking News

Archives

Categories

Meta