कांद्री येथे एका युवकावर धारधार चाकूने हल्ला
कन्हान,ता.५ : डिसेंबर
कन्हान परिसरात आणि ग्रामीण भागात गुन्हेगारीचे चे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असुन नागपुर-जबलपुर राष्ट्रीय महामार्गावर संताजी नगर, कांद्री येथे पाच युवकांनी संगमत करुन युवकावर चाकुने प्राण घातक हल्ला करुन गंभीर जख्मी केल्याने विरेंद्र यादव यांच्या तक्रारी वरून गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांच्या माहिती नुसार रविवार (दि.४) नोव्हेंबर ला सायंकाळी ६ वाजता च्या दरम्यान विरेंद्र राम अवतार यादव (वय-५०) रा.वार्ड क्रमांक ५ कांद्री कन्हान यांनी खाद्य पदार्थाचा ठेला लावला. रात्री दहा वाजता च्या दरम्यान ठेला बंद करित असतांना दुचाकीवरून अनोळखी युवक आला. त्याने विरेंद्र ला शिवीगाळी केली. विरेंद्र यांनी युवकांला शिवीगाळी कां बरं करीत आहे ? असे विचारणा केली असता “तुने गलत जगह पर हाथ डाला है ” असे म्हणुन चार ते पाच मिनटा नंतर मोटर सायकल वर इरफान शेख उर्फ चोरवा हा आपले दोन अनोळखी साथीदार सह विरेंद्र यांच्या ठेल्या जवळ पोहचला. इरफान चोरवा व त्याचे साथीदारा ने विरेंद्र याला हातबुक्कीने मारहाण करण्यास सुरुवात केली. विरेंद्र यांचा पुतण्या हिमांशु यादव हा तिथे पोहचला असता त्याने विरेंद्र याला मारत असलेल्या युवकांना सोबत झटापट करु लागला. यावेळी सोबत आलेल्या चार साथीदारा पैकी बाजुला उभा असलेला अमन कैथवार, अमन खान, नितीन खोब्रागडे, डीसको विशाल साथीदारांनी विरेंद्र यांचा पुतण्या हिमांशु याला विरेंद्र पासुन बाजुला ओळले. अमन कैथवार यांने विरेंद्र यांचा पुतण्या हिमांशु याचा कमरेचा उजव्या बाजुस धारधार चाकूने गंभीर जख्मी करुन आरोपी पसार झाले.
सदर घटनेनंतर जख्मी हिमांशु याला नागरिकांच्या मदतीने उचलून उपचारा करिता प्राथमिक आरोग्य केंन्द्र कन्हान येथे नेले. डॉक्टरांनी प्राथमिक उपचार करुन हिमांशु याला जास्त मार लागला असल्याने पुढील उपचारा करीता चौधरी रुग्णालय कामठी येथे हलविण्यात आले.
पोलीसांनी विरेंद्र यादव यांच्या तक्रारी वरून इरफान शेख उर्फ चोरवा, अमन कैथवार, अमन खान, नितीन खोब्रागडे, डिस्को विशाल व त्याचे तीन अज्ञात आरोपी यांचा विरुद्ध अप क्रमांक ६९९ /२२ कलम ३८७ , ३९७ भांदवि अन्वये गुन्हा दाखल केला. गुन्ह्याचा पुढील तपास नागपुर ग्रामीण अप्पर पोलीस अधिक्षक संदीप पखाले , उपविभागीय पोलीस अधिकारी मुख्तार बागवान यांच्या मार्गदर्शनात कन्हान पोलीस निरीक्षक विलास काळे सह कन्हान पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखा पोलीस आरोपी शोध घेत आहे.
Post Views: 291