बस चालकाचा कारला धडक दिल्याने महिला जख्मी
कन्हान,ता.४ डिसेंबर
नागपुर-जबलपुर राष्ट्रीय महामार्गा वरील तार कंपनी जवळ अज्ञात बस चालकाने आपल्या ताब्यातील वाहन भरधाव वेगाने व निष्काळजीपणे चालवुन कार ला मागुन जोरदार धडक दिली. अपघातात कार पलटी होऊन मोठे नुकसान झाल्याने महिला सोनाली येनुलकर यांचा तक्रारी वरून बस चालका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
शनिवार दिनांक 03 डिसेंबर ला रोजी दुपारी १.०० वाजता च्या दरम्यान सौ.सोनाली विलासराव येनुलकर( वय-31)रा.तळेगाव, वर्धा हे पती विलास येनुलकर, मुलगा सोबिन आणि पती विलास यांचे मित्र राजू किसनराव कूटे त्यांची पत्नी माधूरी व त्यांचा मूलगा, मुलगी असे मिळून सोनाली यांचा कार क्र.एम एच 43 ए.डब्लु-1015 नी टिमकी नागपूर येथे असलेल्या परमात्मा एक च्या निवास स्थानी दर्शना करीता गेले. दर्शन करून सोनाली व त्यांचे कुटुंब सहकारी परमात्मा एक भवन वर्धमान नगर नागपूर येथून 5:30 वाजता च्या दरम्यान सोनाली यांचे माहेर खंडाळा डूमरी येथे जाण्याकरीता निघाले. सायंकाळी सातच्या सुमारास नागपुर जबलपुर राष्ट्रीय महामार्गा ने जात असतांना तार कंपणी जवळ अज्ञात बसच्या चालकाने आपल्या ताब्यातील वाहन भरधाव वेगाने व निष्काळजी पणे चालवुन सोनाली यांचा कार ला मागून जोरदार धडक दिल्याने अपघातात सोनाली यांची कार पलटी होऊन मोठे नुकसान झाले. सोनाली ही जख्मी झाली असून माहूरे हॉस्पीटल कामठी येथे अतिदक्षता विभागात उपचार घेत आहे. सोनाली यांचा सोबत असलेले सदस्यांना दुखापत झालेली नसुन त्यांचावर कन्हान प्राथमिक आरोग्य केंन्द्र येथे उपचार करण्यात आला. सोनाली येनुलकर यांचा तक्रारी वरून पोस्टे ला अज्ञात बस चालका विरुद्ध कलम 279,338 भादवी सह क. 184, 134 (अ) (ब) मोवाका अन्वये गुन्हा दाखल केला. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक विलास काळे यांच्या मार्गदर्शनात पोलीस करीत असुन आरोपीचा शोध घेत आहे .
Post Views: 309
Mon Dec 5 , 2022
परिसरातील वाढत्या गुन्हेगारी आणि अवैध धंध्यावर अंकुश लावण्याची मागणी सात दिवसाचा आत कारवाई करा अन्यथा तीव्र आंदोलन करु – अतुल हजारे भाजपा पदाधिकार्यांचे पोलीस निरीक्षक मार्फत पोलीस अधिकक्षकांना निवेदन कन्हान,ता.५ डिसेंबर ग्रामीण भागात दिवसेंदिवस गुन्हेगारी आणि अवैध धंदे मोठ्या प्रमाणात बिनधास्त पणे सुरु असुन शांती सुव्यवस्थे वर […]