जुनिकामठी गावाचे पुनर्वसन करा. – मनसे तालुका अध्यक्ष रोशन फुलझेले ची मागणी
कन्हान : – त्रिवेणी नदी संगमावरील जुनिकामठी गावाचे तातडीने पुनर्वसन करण्यात यावे. अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) तालुका अध्यक्ष रोशन फुलझेले यांच्या नेतुत्वात शिष्ठमंडळ पारशिवनी नायब तहसिलदार श्री सय्याम यांना निवेदन देऊन करण्यात आली आहे.
यावर्षीच्या पावसाळयात दि.२८ ऑगष्ट २०२० ला आलेल्या पेच व तोतलाडोह धरणाच्या पाण्याच्या विस र्गाचे पेच व कन्हान नदीला आलेल्या महापुरामुळे पेंच, कन्हान व कोल्हार नदीच्या त्रिवेणी संगम काठावर वस लेले जुनिकामठी गावातील कमीत कमी २०० परिवा राला महापुराचा फटका बसल्याने त्यांचे मोठ्या प्रमा णात आर्थिक नुकसान झाले आहे. या लोकांना मागी ल सव्विस वर्षात तिनदा पुराचा सामना करावा लागला आहे. नदी काठावरील परिसरामधे राहणाऱ्या लोकांची परिस्तिथी अत्यंत दयनीय आहे. भविष्यात पुन्हा या पुर परिस्थितीचा येथील रहिवाशीना त्रास होऊ नये यास्तव दुसऱ्या कुठल्या सुरक्षित जागेवर जुनिकामठी गावाचे पुनर्वसन करण्यात यावे अशी मागणी मनसे तालुका अध्यक्ष रोशन फुलझेले यांच्या नेतुत्वात पार शिवनी नायब तहसीलदार मा सय्याम यांना निवेदन देऊन करण्यात आली. यावेळी जिल्हा सचिव मनोज भाऊ गुप्ता, तालुका उपाध्यक्ष नरेंद्र पांडे, रामभाऊ बावने, विक्की नांदुरकर, जुनिकामठी शाखा अध्यक्ष उकुंडराव देवगड़े, राम जुनघरे, मंगेश कावड़े, बबलु गायकवाड, सागर आदी उपस्थित होते.