सुपर टाऊन मध्ये सांडपाणी निकासी नाली व नाल्याचे बांधकाम करण्याची नागरिकांची मागणी
कन्हान : – नगरपरिषद अंतर्गत प्रभाग क्र २ मधिल सुपर टाऊन (प्रगती नगर) लोकवस्ती मध्ये सांडपाणी निकासी करिता नाल्या नसल्याने नाली व नाला बांधकाम करण्याकरिता नगरवासीयानी मा नगराध्यक्षा व मुख्याधिकारी साहेब हयाना निवेदन देऊन लवकरात लवकर नाली बांधकाम करण्याची मागणी केली आहे.
नगरपरिषद कन्हान-पिपरी अंतर्गत प्रभाग क्र २ मधिल सुपर टाऊन (प्रगती नगर) लोकवस्ती मध्ये सांडपाणी निकासी करिता नाल्या नसल्याने लोकांचे सांडपाणी मोकळ्या जागेत साचत असल्याने परिसरा त रोगराई पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच बाजुलाच असलेला मोठा नाला सुध्दा कच्चा असल्याने सांडपाणी निकासी होत नसुन साचुन राहत असल्याने रोगराई चा पसार होऊ शकतो. यास्तव या लोकवस्ती मध्ये घराचे सांडपाणी निकासी करिता नाली बांधकाम करण्यात यावे. तसेच बाजुलाच अस लेल्या कच्या नाल्याचे बांधकाम सुध्दा करण्यात यावे. जेणे करून पावसाळयाचे व नेहमीचे साडपाण्याची निकासी व्यवस्थित होऊन नागरिकांना त्रास होणार नाही. करिता नगरपरिषद मा. नगराध्यक्षा, मुख्याधिका री साहेब हयाना सुपर टाऊन (प्रगती नगर) चे सर्व नगरवासी सुर्यभान चकोले, संतोष दहीफळकर, सुतेश मारबते, दिपक गुप्ता, दिलीप बंड, दिलीप लाडेकर, संदीप पोकळे, पुंडेजी, तिवारीजी सह नागरिकांनी निवेदन देऊन मागणी केली आहे.