टेकाडी येथे नागरिकांना मास्क वाटप करून जनजागृती
ग्राम पंचायत टेकाडी (कोख) य सरपंच व सदस्य यांचा उपक्रम.
कन्हान : – टेकाडी येथे कोरोना चा प्रादुर्भाव दिवसे दिवस वाढत असल्यामुळे ग्राम पंचायत टेकाडी (को ख) द्वारे शासनाच्या प्रतिबंधक सर्व नियमाचे पालन करून गावात फिरून नागरिकांना मास्क वाटप करित कोरोना शी लढण्या विषयी जनजागृती करण्यात आली.
देशात, राज्यात, जिल्ह्यात, तालुक्यात, टेकाडी गावात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेदिवस वाढत अस ल्यामुळे शासनाच्या प्रतिबंधक नियमाचे पालन करून मास्क, सोशल डिस्टेसिंगचे पालन करित ग्राम पंचायत टेकाडी (कोख) च्या सरपंचा सौ सुनिताताई मेश्राम यांनी सदस्यासह सोबत गावात फिरून नागरिकांना मास्क वाटप करित कोरोना आजाराशी लढण्या विष यी जानजागृती करण्यात आली. तसेच गावातील नाग रिकांनी कोरोना सारख्या घातक महामारी विषाणु पासुन वाचण्याकरिता मास्क, सेनिटाइजर, सोशल डिस्टेसिंगचे पालन करावे, विना कामाने घरा बाहेर पडु नये, गर्दी जाणे टाळावे या शासनाच्या प्रतिबंधात्मक नियमाचे काठेकोरपणे पालन करून आपल्या व आप ल्या परिवाराची काळजी घेत घरीच राहावे असे कडक डीचे आवाहन ग्राम पंचायत टेकाडी (कोख) सरपंचा सौ सुनिताताई मेश्राम यांनी नागरिकांना केले.