*नियमबाह्यरित्या राबविली जात आहे केन्द्रप्रमुख पदोन्नती प्रक्रिया*
*पात्र प्राथमिक शिक्षकांवर अन्याय*
कन्हान ता : नुकतीच जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने केंद्रप्रमुखाची खुल्या प्रवर्गातील पदे पदोन्नतीने भरण्याबाबत कार्यवाही सुरू केलेली आहे.मात्र हे करीत असताना पदवी व बीएड अर्हता धारण केलेल्या पात्र प्राथमिक शिक्षकांना यादीत स्थानच देण्यात आले नाही.शासन निर्णय क्र.संकीर्ण-2016/प्र.क्र.(163)/टी एन टी-1/मंत्रालय मुंबई 4000032 दिनांक:16 फेब्रुवारी 2018 नुसार केंद्रप्रमुख पदोन्नतीची 30 टक्के पदे जिल्हा परिषदेच्या प्रशिक्षित प्राथमिक शिक्षक पदावर 3 वर्ष अखंड सेवा झालेल्या शिक्षकांमधून सेवाज्येष्ठतेने भरण्यात येतील असे निर्देशीत केलेले आहे.याचा अर्थ जे शिक्षक सहायक शिक्षक (प्राथमिक)पदावर कार्यरत आहेत व तीन वर्षाचा अनूभव असून मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी व बी एड ही अर्हता धारण केली असेल तर असे शिक्षकसुद्धा केंद्रप्रमुख पदोन्नतीस पात्र आहेत परंतू शिक्षण विभाग जी प नागपूर कडून दिनांक 4 मे 2021 ला केंद्रप्रमुख पदोन्नती करीता प्रसिद्ध केलेल्या यादीत पात्र प्राथमिक शिक्षकांना वगळून फक्त पदवीधर विषय शिक्षक पदावर कार्यरत शिक्षकांनाच स्थान देण्यात आले…
शिक्षण विभागाने प्रसिद्ध केलेली सदर्हु यादी पूर्णतः नियमबाह्य असल्यामुळे ती रद्द करून व 16 फेब्रुवारी 2018 च्या शासन निर्णयानुसार प्रशिक्षित प्राथमिक शिक्षकांचा सुद्धा सेवाज्येष्ठतेने समावेश करून सुधारीत यादी प्रसिद्ध करण्यात यावी.अन्यथा संघटनेकडून याचा तीव्र विरोध केला जाईल अशी मागणी एका निवेदनाद्वारे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी व प्राथमिक शिक्षणाधिकारी यांच्याकडे अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष धनराज बोडे,सरचिटणीस विरेंद्र वाघमारे यांचेसह,शिक्षक नेते गोपालराव चरडे,रामू गोतमारे,सुनिल पेटकर, सुभाष गायधने,ज्ञानेश्वर वंजारी,आनंद गिरडकर, गजेंद्र कोल्हे,अशोक बावनकुळे,पंजाब राठोड, लोकेश सुर्यवंशी,दिलीप जिभकाटे,अशोक डोंगरे,उज्वल रोकडे,संजय शिंगारे,मनोहर बेले,जागेश्वर कावळे,आशा झिल्पे,सिंधू टिपरे आदींनी केली.