मंत्री सुनील केदार यांच्या हस्ते “शिव भोजन थाळी”केन्द्राचे उदघाटन
*अल्पदरात मीळाणार पोटभर जेवण*
सावनेर : शहरात महाराष्ट्र शासनाने सुरु केलेले शिव भोजन थाळी केन्द्र सुरु व्हावे व गोरगीबांना अल्पदरात जेवण मिळावे या हेतूने क्षेत्राचे आमदार व महाराष्ट्र शासनाचे पशुसंवर्धन, दुग्ध विकास,क्रीडा व युवक कल्याण मंत्री मा.सुनील केदार यांच्या प्रयत्नातून व त्यांच्या हस्ते बसवार काँम्पलेक्स बस स्थानक सावनेर परिसरात “शिव भोजन थाळी”केन्द्राचे थाटात शुभारंभ करण्यात आले.
महाराष्ट्र शासनाची ही महत्वाकांक्षी योजना आपल्या कार्यक्षेत्रात सुरू व्हावी व याचा लाभ आपल्या क्षेत्रातील गोरगरीबांना व्हावा व त्यातून रोजगाराची संधी उपलब्ध करुण देण्याचा आपला प्रामाणिक प्रयत्न असल्याचे व या योजनेचा लाभ शहरा सोबतच ग्रामीण भागातील गोरगरीबांना होईल तसेच कोरोना विषाणूंच्या प्रादुर्भावामुळे एकीकडे रोजगार नाही,मजूर व कामगारांच्या हाताला काम नही अश्यात ही योजना अंत्यत प्रभावी ठरेल असे विचार याप्रसंगी मा.सुनील केदार यांनी व्यक्त करत “शिव भोजन थाळी केन्द्राचे” फित कापून शुभारंभ करण्यात आले.
याप्रसंगी वाढत्या कोरोना विषाणूंच्या प्रादुर्भावावर चिंता व्यक्त करत म्हटले की कोरानाचा नायनाट करण्यासाठी संपूर्ण शासकीय यंत्रणा आपले कार्य जबाबदारी योग्य रित्या पार पाडत आहे त्याकरिता लोकांनी ही त्यांना सहकार्य करावे व शासनाच्या दिशानिर्देशाचे पालन करावे असे मी या क्षेत्राचा आपला जनप्रतिनीधी व राज्य शासनाचा मंत्री म्हणून आपणास विनंती करतो असे मार्मिक आव्हान आपल्या संबोधनातून केले.याप्रसंगी जिल्हा परिषद नागपूर चे उपाध्यक्ष मनोहर कुंभारे,अँड् श्रीकांत पांडे, उपविभागीय अधिकारी अतुल म्हेत्रे,तहसीलदार दिपक कारंडे,मुख्याधिकारी रविंद्र भेलावे,पोलीस निरिक्षक अशोक कोळी,माजी नगराध्यक्ष पवन जैस्वाल,माजी नगरसेवक विजय बसवार, नगरसेवक निलेश पटेल, लक्ष्मीकांत दिवटे, सुनिल चाफेकार ,दिपक बसवार प्रा.डॉ. योगेश पाटील, नरसिंग हजारी,गोपाल घटे,प्रा.साहेबराव विरखरे,व्यापारी संघाचे सचिव मनोज बसवार,श्रीजय देशमुख,चंदु कामदार,अश्विन कारैकार,घनश्याम तुर्के,राजेश खंगारे प्रामुख्याने उपस्थित होते
याप्रसंगी शिव भोजन थाळी केन्द्राचे संचालक श्रीकांत हजारी यांनी आपले विचार व्यक्त करत म्हटले की हा व्यवसाय नसुन गोरगरीबांची सेवा करण्याची योजना आहे व ती मला प्राप्त झाली त्याबद्दल मी मा.मंत्री साहेब तसेच सर्वांचा आभारी असुन या योजनेचा लाभ सर्वांना देण्याचा माझा निर्धार राहील असा विश्वास याप्रसंगी व्यक्त केला.