केंन्द्र सरकार चा विरोधात कॉंग्रेस ने केेले आंदोलन
#) निवेदनाने कृषी व कामगार विधेयक मागे घेण्याची केली मागणी.
कन्हान : – कृषी विधेयक व कामगार विधेयक बिल घाईघाईने मंजुर केल्याच्या विरोधात कन्हान येथे शुक्रवारी सायंकाळी काँग्रेस पार्टी च्या वतीने रास्ता रोको आंदोलन करुन आंबेडकर चौक पासुन गांधी चौक पर्यंत विशाल मोर्चा काढुन केंन्द्र सरकार चा विरोधात जोरदार प्रदर्शन करित कृषी व कामगार विधेयक मागे घेण्याची मागणी करण्यात आली.
डॉ आंबेडकर चौक कन्हान येथे शुक्र वार ला सायंकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर च्या पुतळ्याला माल्यार्पण करून जिल्हा परिषद अध्यक्षा रशमी बर्वे, माजी आमदार एस क्यु जामा, काँग्रेसचे नेते उदयसिंह (गज्जु) यादव, नरेश बर्वे, दयाराम भोयर, राजेश यादव, आकीब सिद्दीकी, मोहसीन खान, राजा यादव आदी च्या नेतुत्वात रास्ता रोको आंदोलन करून मोदी व योगी सरकार चा पुतळयाचे दहन करित मोदी व योगी सरकार मुर्दा बाद.. मुर्दाबाद च्या घोषणा देत आंबेडकर चौक येथुन गांधी चौक पर्यंत मोर्चा काढण्यात आला व गांधी चौकात उत्तर प्रदेशात एका वाल्मिकी परिवारातल्या मुलीवर झालेल्या घटनेचा कैंडल जाळुन जाहिर निषेध करित दोन मिनीटाचे मौन धारण करून मनिषा वाल्मिकी ला भावपुर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. कांग्रेस पार्टीच्या विविध आघाड्यांच्या व्दारे कन्हान पोलीस स्टेशन चे प्रभारी थानेदार चंन्द्रकांत मदने व नायब तहसी लदार यांना निवेदन देऊन केंन्द्र सरकार पर्यंत पाठवुन कृषी व कामगार विधेयक मागे घेण्याची मागणी करण्यात आली. तसेच वाल्मिकी परिवारातल्या मुलीवर सामुहिक दुष्कर्म करणार्यां आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मांगणी केली.
याप्रसंगी आंदोलनात प्रशांत वाघमारे, कुशल पोटभरे, निखिल पाटील, कांद्री सरपंच बलवंत पडोळे, उपसरपंच श्याम कुमार बर्वे, सय्यद अफजल हुसेन चांद भाई, गणेश माहुरे, अजय कापसीकर, गणेश भालेकर, शुभम यादव, नगरसेविका रेखा टोहणे, नगरसेवक मनिष भिवगडे, निखिल बागडे, सतीश भसारकर, शरद वाटकर, गणेश सरोदे, निखिल तांडेकर, अरूण पोटभरे, निकेश मेश्राम, कार्तिक थोटे, अक्षय देशमुख, निलेश गिरे, आकाश रहिले, गौरव भोयर, प्रमोद बांते, अमोल प्रसाद, सारंग काळे, शक्ती पात्रे, अविनाश रायपुरे, पंकज गजभिए, प्रदीप बावने, प्रशांत मसार, दिपक तिवाडे, आकाश माहतो, आकाश यादव, साहिल गजभिए, पारस मरघडे, महेश झोडवने सह काॅंग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ता मोठ्या संख्येत उपस्थित होते.