नवरात्री रास गरबा महोत्सव कन्हान येथे जोमात रंगत  माहेर महिला मंच व्दारे रास गरबा महोत्सवाचे आयोजन 

नवरात्री रास गरबा महोत्सव कन्हान येथे जोमात रंगत 

माहेर महिला मंच व्दारे रास गरबा महोत्सवाचे आयोजन 

कन्हान,ता.०६

    माहेर महिला मंच कन्हान, कांद्री, टेकाडी व्दारे नागपुर जबलपुर राष्ट्रीय चारपदरी महामार्गा वरिल कुलदीप मंगल कार्यालय मैदान कन्हान येथे आदी शक्ती, कुलस्वामिनी दुर्गा मातेचे नवरात्र महिला शक्ती प्रेरित या महोत्सवात करण्यात आली आहे. मातेच्या नामस्मरणात रास गरबा खेळत, जयघोष करित, भक्तीत रसात तल्लीन हो़ऊन आंनदोत्सव कन्हान येथे रास गरबा महोत्सव २०२४ अतिशय जोमाने चांगलाच रंगत आणुन परिसरातील भाविकांचे आकर्षणाचे केंद्र ठरत आहे.

 

    गुरूवार (दि.३) ऑक्टोंबर रात्री ८ वाजता माहेर महिला मंच कन्हान, कांद्री, टेकाडी व्दारे कुलदीप मंगल कार्यालय मैदान जे.एन. रोड कन्हान येथे नवरात्री उत्सव थाटात साजरा करण्यास येत आहे. रास गरबा महोत्सव २०२४ आदीशक्ती, कुलस्वामिनी दुर्गा मातेची विधीवत पुजा अर्चनाचे आयोजन नरेश बर्वे व सौ.रिता बर्वे यांनी केले आहे. रास गरबा मैदानावर प्रतिमे सामोर घट स्थापना करून रामटेक खासदार श्यामकुमार बर्वे, रश्मी बर्वे, शिवसेना माजी खासदार प्रकाश भाऊ जाधव, कॉग्रेस नागपुर ग्रामिण जिल्हाध्यक्ष राजेंद्र मु़ळक यांच्या हस्ते ज्योत प्रज्वलित व मातेची आरती करून रास गरबा महोत्सवाची थाटात सुरुवात करण्यात आली.

   घर आणि मुलाबाळांच्या सांभाळ कऱणा-या महिलांना स्वतंत्र पणे सामाजिक जिवनात मुलांंबाळांसह नारी शक्ती प्रेरित नवरात्रीचा आंनदोत्सव साजरा करता यावा. महिलांना हक्काचे मंच मिळावे या सार्थ उद्देशाने रास गरबा महोत्सवाचे आयोजन करून मागील पंधरा दिवसा पासुन रास गरबाची तालिम घेत छोटया मुली, महिला व १५ वर्षाचे आत मुले असे ३०० च्यावर स्पर्धकांनी सहभाग घेतला आहे.

   नव दिवस रास गरबा खेळणा-या उत्कुष्ट स्पर्धक तसेच सहभागी विविध स्पर्धकांना मंच व्दारे बक्षीस देऊन गौरव करून प्रोत्साहित करण्यात येत आहे.

   रास गरबा महोत्सव २०२४ च्या यशस्वितेकरिता माहेर महिला मंच संचालिका, अध्यक्षा सौ.रिता नरेश बर्वे, कन्हान उपाध्यक्षा वैशाली सुरेश बेलनकर, सचिव- सुनिता चिंधुजी मानकर, कांद्री अध्यक्षा दिप्ती रविंद्र समरित, उपाध्यक्षा नम्रता विलास बावनकुळे, सचिव प्रीती राजेश दिक्षीत, टेकाडी अध्यक्षा आशा अनिल मोहोड, उपाध्यक्षा करूणा टोलुराम भोवते, सचिव सुनिता चंद्रमणी भेलावे, व्यवस्थापन समिती गुंफा तिडके, रेखा टोहणे, स्वाती मस्के, मोना बर्वे, सिमा मनघटे, उत्सव समिती- चेतना भोवते, अश्विनी गाढवे, वर्षा सातपुते, प्रणाली रंगारी, छाया रंग, पारितोषिक समिती- दर्शना तिडके, रजनी कवडे, सुमन भिवगडे, मनिषा खानकुरे, मनिषा बर्वे, पुजा समिती- भारती बर्वे, शैला राऊत, सुनिता पांडे, माधुरी फुकटकर, शालु गजबे, आरती राऊत, स्वागत समिती- संगिता वांढरे, ज्योती आंबिलढुके, कंचन म्हस्के, रंजना देशभ्रतार, सारिका खोब्रागडे, मंदा बागडे, मिना वाटकर, अतिथी नियोजन समिती- मिना ठाकुर, मंजु जंम्बे, संध्या सिंग, भुमिका बोरकर, श्रीम ती पुष्पा कावडकर, श्रीमती कल्पना नितनवरे, श्वेता थटेरे, कोमल वांढेकर, इंद्रकला गिरडकर, चंपा दारोडे, निर्णायक समिती- आशा खंडेलवाल, चारू चौकसे, नितु तिवारी, राधिका झेंडे आदी सह समस्थ महिला सदस्य परिश्रम करित आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

‘लाडकी बहीण’ हिट; लाडक्या बहिणींनी शिकवला धडा

Tue Nov 19 , 2024
बल्लारपूर – विधानसभा निवडणुकीत लाडकी बहीण योजना सुपरहिट ठरल्याने महायुतीचे पारडे जड झाल्याचे रिपोर्टस् मिळू लागल्याने महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आता रडीचा डाव खेळायला सुरुवात केली आहे. त्याचेच प्रत्यंतर म्हणून बल्लारपूर विधानसभा मतदारसंघातल्या कोसंबी गावात सोमवारी रात्री काँग्रेसच्या गुंडांनी भाजपा कार्यकर्त्यांबरोबर राडा करत थेट मा. मंत्री व महायुतीचे उमेदवार सुधीरभाऊ मुनगंटीवार […]

You May Like

Breaking News

Archives

Categories

Meta