फोन वर लिंक वर माहीती पाठविण्यास सांगुन २५ हजार रूपयांची फसवणुक
कन्हान : – फिर्यादीस अज्ञात आरोपीने फोन करून आपला जियो फोन बंद होणार असल्याने आपले आधार कार्ड लिंक करण्याकरिता लिंकवर संबधित माहीती पाठविण्यास भाग पाडुन माहीती पाठविताच बॅंकेतुन मॅसेज आला की दोन वेळा खात्यातुन २५१७६ रूपये काढल्याचे लक्षात येताच आपली फसवणुक झाल्याने रविशंकर पाल हयांनी कन्हान पोलीस स्टेशन ला अज्ञात आरोपी विरूध्द तक्रार दाखल केली.
वेकोलि इंदर कॉलरी नं ६ येथील रहिवासी रविशंकर शिवप्रसाद पाल वय ४१ वर्ष यास गुरूवार (दि.३) डिसेंबर ला सायंकाळी ५ ते ७ वाजता दरम्यान अज्ञात आरोपीने फोन करून आपला जियो फोन बंद होणार आहे.
करिता आपले आधार कार्ड मोबाईलवर लिंक करणे आवश्यक असल्याने मी खालील लिंक पाठवित आहे ती ओपन करून संबधित माहीती पाठवा म्हणुन विश्वास संपादन करून लिंक वर माहीती भरताच काही वेळाने सेंट्रल बॅंक शाखा कन्हान वरून मॅसेज आला की पहिले २४ हजार रू व दुस-यांदा ११७६ रू असे दोन वेळात २५१७६ रूपये काढल्याचे कळल्याने आपली फसवणुक झाल्याचे लक्षात येताच फिर्यादी रविशंकर पाल यांनी कन्हान पोलीस स्टेशन (दि.५) गाठुन अज्ञात आरोपी विरूध्द तक्रार दाखल केली. कन्हान पोलीस स्टेशन चे ए पी आय अमित कुमार आत्राम पुढील तसास करित आहे. अश्या फसवणुकी मुळे लोकांनी कुणीही अज्ञात व्यक्तीना आपले आधार कार्ड व महत्वाची माहीती देऊ नये जेणे करून फसवणुक होणार नाही.