आज रामटेक ला साहित्य रत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती आणि शाहिर मेळावा
कन्हान,ता.06 ऑगस्ट
महाराष्ट्र शाहीर परिषद रामटेक व भारतीय कलाकार शाहीर मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने साहित्य रत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची जयंती आणि लोककलावंत, कलाकारांचा शाहीर मेळावा संत रोहीदास सभागृह मंगळवारी वार्ड रामटेक येथे रविवार (दि.७) ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आला आहे.
भारतीय लोककला लोप पावु नये, ग्रामिण लोक कलेची जोपासणा करण्याकरिता ग्रामिण लोक कलावंताना प्रोत्साहन मिळण्याच्या सार्थ हेतुने महाराष्ट्र शाहीर परिषद रामटेक व भारतीय कलाकार शाहीर मंडळ रामटेक यांच्या संयुक्त विद्यमाने साहित्य रत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची जयंती आणि लोककलावंत, कलाकारांचा शाहीर मेळावा संत रोही दास सभागृह मंगळवारी वार्ड रामटेक जि. नागपुर येथे रविवार (दि.७) ऑगस्ट ला सकाळी ९ ते सायंकाळी ७ वाजे पर्यंत आयोजित करण्यात आला. शाहीर मेळाव्याचे कवी मा. ज्ञानेश्वर वांढरे विभागीय उपाध्यक्ष म.शा.प.पुणे, तथा अध्यक्ष विदर्भ साहित्य संघ कामठी यांचे अध्यक्षेत व मा.राजेंद्र मुळक माजी मंत्री, अध्यक्ष कॉग्रेस कमेटी नागपुर जिल्हा ग्रामिण यांचे हस्ते उद्घाटन करण्यात येणार आहे. याप्रसंगी मा.भागवतजी सहारे संस्थापक अध्यक्ष भीम संग्राम सेना रामटेक, मा.रमेश कारेमोरे जिल्हा प्रमुख प्रहार संघटना, मा. शाहीर राजेंद्र बावनकुळे अध्यक्ष भारतीय कलाकार शाहीर मंडळ व जिल्हाध्यक्ष म.शा.प. नागपुर, मा. कैलासजी राऊत माजी सभापती व जि.प.सदस्य रामटेक, मा. नरेश बंधाटे सदस्य प.स.रामटेक, मा.राजेश राठोर समाता दुत रामटेक, मा.संजय मुलमुले उपाध्यक्ष भा जपा नागपुर जिल्हा, मा. दिलीपजी देशमुख माजी नगराध्यक्ष रामटेक, मा. अमोल मानकर माजी उपाध्यक्ष न.प.रामटेक आदीच्या प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. यावेळी मान्यवरांच्या हस्ते शाहीरांचा सत्कार करण्यात येईल. या मेळाव्यास बहुसंख्येने शाहीर, लोककलावंत, कलाकारांनी उपस्थित राहुन कार्यक्रमा चा लाभ घ्यावा. असे आवाहन महाराष्ट्र शाहीर परिषद रामटेक तालुका अध्यक्ष शाहीर अरूण मेश्राम याांनी केले आहे. मेळाव्याच्या यशस्वितेकरिता शाहीर शंकर वडांद्रे शा. प्रदीप कडबे, शा.वासुदेव आष्टणकर शा. लिलाधर वडांद्रे, शा. विरेंद्र सेंगर, रविंद्र मेश्राम, रामराव वडांद्रे, रमेश रामटेके, वासुदेव नेवारे, शंकर मौतकर, विष्णु मेंघरे, हिरालाल बघण, दिलीप मे़श्राम, विष्णु समरित, राजेंद्र बावणे, सुखदेव नेवारे, दर्शन मेश्राम, मधुकर भोयर, जयराम चौधरी, भास्कर उमाळे, शा.पंचफुला मस्की, शा.दुर्गाबाई वासनिक, शा.अनिता बावणे सह लोककलावंत शाहीर मंडळी परिश्रम घेत आहे.
Post Views: 847
Mon Aug 8 , 2022
धर्मराज प्राथमिक शाळेच्या “भारत माता की जय” च्या घोषणेने दुमदुमली कांद्री नगरी कन्हान,ता.८ ऑगस्ट स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त धर्मराज प्राथमिक शाळेच्या वतीने “सन्मान तिरंगा” जनजागृती रॅली आज (ता. ८) कांद्री नगरात काढण्यात आली. धर्मराज प्राथमिक शाळेच्या वर्ग तिसरी व चवथी च्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी हातात तिरंगा घेत ‘भारत माता की जय’ […]