मध्यप्रदेशात काँग्रेसचा केदार यांच्या रणनीतीवर भरवसा
विधानसभा पोटनिवडणुकीसाठी समन्वयक सुनील केदार
सावनेर : मध्यप्रदेशातील मुरैना व ग्वालियर या दोन्ही जिल्ह्यातील आठ विधानसभा क्षेत्रात पोटनिवडणूक पोटनिवडणूक होणार आहे . या पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसने राज्याचे पशुसंवर्धन , दुग्धविकास , क्रीडा व युवक कल्याणमंत्री सुनील केदार यांच्या रणनीतीवर भरवसा दाखवला .सुनिल केदार यांची मध्यप्रदेशातील विधानसभा पोटनिवडणुकीसाठी समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली.
मध्यप्रदेशातील मुरैना जिल्ह्यातील जौरा , सुमावली , मुरैना , दिमनी आणि अंबाह तर ग्वालियर क्षेत्रात नुकताच अंबाह तर ग्वालीयर , ग्वालीयर पूर्व आणि डबरा या विधानसभा क्षेत्रात पोटनिवडणूक होणार आहे. केदार या आठ मतदारसंघात काँग्रेसचे समन्वयक म्हणून जाबबादरी पार पाडणार आहेत .
केदार यांचे राजकीय कौशल्य जवळून बघणारे माजी केंद्रीयमंत्री कमलनाथ यांनी आठही मतदार संघाच्या विजयासाठी त्यांची समन्वयक म्हणून नियुक्ती केली .यातील ग्वालियर क्षेत्रात नुकताच भाजपमध्ये प्रवेश घेणारे ज्योतिरादित्य सिंधिया यांचे वर्चस्व आहे . त्यामुळे केदार आता ग्वालियरमध्ये ज्योतिरादित्य सिंधिया यांना आव्हान देणार आहे . सुनील केदार यांनी यापूर्वीही बिहार येथील निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे समन्वयक म्हणून जबाबदारी पार पाडली आहे . एकेकाळी राजकीय कौशल्याने संपूर्ण नागपूर जिल्ह्यावर केदार यांचे वर्चस्व होते . एवढेच नव्हे मागील निवडणुकीत भाजपने संपूर्ण जिल्ह्यात यश मिळवले . परंतु केदार यांनी प्रतिकूल परिस्थितीत सावनेरचा बालेकिल्ला कायम राखला होता . मागील वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीतही केदार यांनी विरोधकांना धूळ चारत मंत्रीपदाला गवसणी घातली . आता मध्यप्रदेशातील पोटनिवडणुकीत केदार कोणती रणनिती वापरणार ? काँग्रेसला विजय मिळवून देणार काय ? याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे .