डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना ६६ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्य अभिवादन
कन्हान,ता.६ डिसेंबर
भारतीय राज्यघटनेचे निर्माते, जगाचा सूर्य, क्रांती सूर्य, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६६ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त ६ डिसेंबर रोजी रिपब्लिकन सांस्कृतिक संघाच्या वतीने दीप प्रज्वलन व विनम्र अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कन्हान परिसरातील बौद्ध अनुयायी, विविध राजकीय पक्ष, संघटना, सेवाभावी संघटना, समता सैनिक दल कन्हान यांनी मध्यरात्री 12 वाजता प्रार्थना केली. पंचशील नगर सत्रापूर ते कन्हान येथून कँडल मार्च काढून डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकातील पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी रिपब्लिकन सांस्कृतिक संघाचे अध्यक्ष चंद्रशेखर भीमटे, कैलाश बोरकर,हमनोज गोंडाने, महेंद्र चव्हान, अखिलेश मेश्राम, पंकज रामटेके, रोहित मानवटकर, रॉबिन निकोसे, अश्वमेघ पाटील, विवेक पाटील, अभिजीत चांदूरकर, महेश धोंगडे, राजेंद्र फुलझेले, निखिल रामटेके, रामदास धनविजय, केशव मेश्राम, शिवशंकर भिवगड़े, कमलाकर राऊत, भीमराव मेश्राम, यशवंत गड़पाडे, उमेश पौनीकर, रितिक कापसे, करण मेश्राम, अर्पित रंगारी, निरज सुदामे, दुर्गाताई निकोसे, सारिकाताई धारगावे, मायताई चिमनकर, अम्रपाली वानखेडे, माया बेलेकर, शारदा वारके, रत्नमाला वराडे ,उषा संगोड़े, संध्या साखरे, ज्योति मोटघरे, माया वाघमारे, विजया निकोसे, अनिता चाहांदे, गजभिये ताई, बागड़े ताई, करुणा डोंगरे, पार्वती माटे, प्रमिला घोड़ेश्वर, काजल भावते, चव्हाण ताई, सांगोडे ताई, भावना टैंभूर्णॆ, नंदा मानवटकर, फुलझेलेे ताई, पिंकी मेश्राम, नितेश टैंभूर्णॆ, जीतू टैंभूर्णॆ, आदित्य टैंभूर्णॆ, रोहित रॉय, आर्यन भीमटे, संदीप शेंडे, सन्नी गजभिये आदींनी बाबासाहेबांना अभिवादन केले.
Post Views: 657
Thu Dec 8 , 2022
*राष्ट्रसंतांच्या आगमनाने शहर पावन झाले* *माणसाची सर्वात मोठी शक्ती म्हणजे त्याची विचारसरणी -राष्ट्रीय संत महोपाध्याय श्री ललित प्रभसागरजी* सावनेर 8 डिसेंबर. राष्ट्रसंत महोपाध्यायश्री ललितप्रभसागरजी महाराज यांनी आपली विचारसरणी सकारात्मक आणि सशक्त कशी बनवायची या विषयावर सांगितले की, या जगात माणसाच्या जीवनात सर्वात मोठी कोणती शक्ती असेल तर ती त्याची विचारसरणी […]