*कन्हान येथे बाळशास्त्री जांभेकर जयंती निमित्य पत्रकार सत्कार समारोह कार्यक्रम थटात साजरा*
#) कन्हान शहर विकास मंच द्वारे कार्यक्रमाचे आयोजन .
कन्हान – कन्हान शहर विकास मंच द्वारे आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचा जयंती निमित्य पत्रकार सत्कार समारोह कार्यक्रमाचे आयोजन गांधी चौक येथे करण्यात आले असुन आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचा प्रतिमेस सर्व पत्रकारांचा उपस्थिति मध्ये पुष्प हार अर्पण करुन व पुष्प अर्पित करुन विनम्र अभिवादन करीत सर्व पत्रकारांचा सत्कार करून बाळशास्त्री जांभेकर यांचा जयंती निमित्य पत्रकार सत्कार समारोह कार्यक्रम थटात साजरा करण्यात आला .
बुधवार दिनांक ६ जानेवारी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचा जयंती निमित्य पत्रकार सत्कार समारोह कार्यक्रमाचे आयोजन कन्हान शहर विकास मंच द्वारे गांधी चौक येथे करण्यात आले असुन महाराष्ट्र ग्रामीण जिल्हा उपाध्यक्ष मोतीराम रहाटे , ग्रामीण पत्रकार संघ कन्हान चे अध्यक्ष रमेश गोळघाटे , कार्याध्यक्ष अजय त्रिवेदी , सचिव सुनिल सरोदे , कन्हान मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष सुर्यभान फरकाडे , सचिव सतीश घारड , कन्हान शहर विकास मंच अध्यक्ष प्रवीण गोडे सह अनेक पत्रकारांचा उपस्थिति मध्ये आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचा प्रतिमेस हार अर्पण करुन कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली असता सर्व पत्रकारांचा डायरी पेन व पुष्प गुच्छ देऊन सत्कार करण्यात आल्याने महाराष्ट्र ग्रामीण जिल्हा उपाध्यक्ष मोतीराम रहाटे , ग्रामीण पत्रकार संघ कन्हान चे अध्यक्ष रमेश गोळघाटे , कार्याध्यक्ष अजय त्रिवेदी , कन्हान मराठी पत्रकार संघाचे मार्गदर्शक चंन्द्रकुमार चौकसे , व कन्हान वार्ता पेपर चे मुख्य संपादक मोहम्मद अली आजाद यांनी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचा जीवनावर मार्गदर्शन केले . त्यानंतर सर्व पत्रकारांना अल्पोहार वितरित करुन पत्रकार सत्कार समारोह कार्यक्रम थटात साजरा करण्यात आला .
कार्यक्रमाचे सुत्र संचालन मंच सदस्य अखिलेश मेश्राम यांनी केले तर आभार मंच महिला सदस्य पौर्णिमा दुबे यांनी मानले .
कार्यक्रम यशस्विते करिता कन्हान शहर विकास मंच अध्यक्ष प्रवीण गोडे , उपाध्यक्ष रुषभ बावनकर , सचिव प्रदीप बावने , महासचिव संजय रंगारी , हरीओम प्रकाश नारायण , प्रवीण माने , सतीश ऊके , मनिष शंभरकर , मुकेश गंगराज , अलीभाई , सुषमा मस्के , वैशाली खंडार , शाहरुख खान , सोनु खोब्रागडे , जाॅकी मानकर , प्रकाश कुर्वे सह आदि मंच पदाधिकारी यांनी सहकार्य केले .